बनावट प्रमाणपत्राद्वारे शाैचालय दाखविल्याचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:58+5:302021-02-05T08:52:58+5:30

चामोर्शी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मुरखळा चक येथील अर्चना राकेश गुरनुले ह्या वागदरा वाॅर्ड क्रमांक ३ मधील रहिवाशी असून ...

Allegation of showing toilet with fake certificate | बनावट प्रमाणपत्राद्वारे शाैचालय दाखविल्याचा आराेप

बनावट प्रमाणपत्राद्वारे शाैचालय दाखविल्याचा आराेप

चामोर्शी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मुरखळा चक येथील अर्चना राकेश गुरनुले ह्या वागदरा वाॅर्ड क्रमांक ३ मधील रहिवाशी असून त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शौचालय असल्याचे बनावट प्रमाणपत्र ग्रामपंचायतच्या सचिवाकडून घेऊन प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे. यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता तक्रारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनीच व ग्रा.पं. सचिवांनी संबंधित पदाधिकाऱ्याला तपास करण्याऐवजी नवीन शौचालय त्वरित बांधण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. पत्रकार परिषदेला ग्रा.पं. सदस्य मधुकर चिंतलवार, नेताजी मडावी, रामभाऊ कुंभारे, दिनेश मडावी, राजू गेडाम, भास्कर मांडमवार, सचिन तिर्यलवार उपस्थित होते.

मात्र, यासंदर्भात ग्रामसचिव शेंडे यांना विचारणा केली असता, मी स्वत: ग्रामपंचायतच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अर्चना गुरनुले यांच्या घराची पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान शौचालय दिसून आले. त्याची खात्री केल्यानंतरच शौचालयाचे प्रमाणपत्र दिलेले आहे, असे सांगितले.

काेट...

तक्रार प्राप्त होताच विलंब न करता ग्रामविकास अधिकारी काळबांडे व अभियंता वाघमारे यांना चौकशीसाठी पाठविले. त्याचा अहवाल प्राप्त होताच पडताळणी करून यात दाेषी आढळल्यास बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल.

नितेश माने, गटविकास अधिकारी पंचायत समिती चामाेर्शी

Web Title: Allegation of showing toilet with fake certificate