३१ हजार रुपयाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST2021-07-10T04:25:45+5:302021-07-10T04:25:45+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देसाईगंज परिसरात दूध डेअरी ते तुळशी रोडने गस्त घालत असताना एक इसम दुचाकी वाहनावर ...

Alcohol worth Rs 31,000 seized | ३१ हजार रुपयाची दारू जप्त

३१ हजार रुपयाची दारू जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देसाईगंज परिसरात दूध डेअरी ते तुळशी रोडने गस्त घालत असताना एक इसम दुचाकी वाहनावर चुंगळी मांडून संशयीतरीत्या येताना दिसला. त्याला थांबवून नमूद दुचाकी वाहनाची पाहणी केली असता त्याच्या वाहनात ३१ हजार २०० रुपयांची दारू आढळून आली. दुचाकी व दारू जप्त केली. त्याला सदर देशी दारूच्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, आकाश सिडाम, माँटी बनकर, आशिष मेश्राम, शहजाद शेख सर्व रा. आंबेडकर वाॅर्ड देसाईगंज यांनी पहाटेला गोंदिया जिल्ह्यातून आपापल्या दुचाकी वाहनांनी तुळशी ते दूध डेअरी रोडवरील लहान नहराजवळ देशी दारूचा साठा करून ठेवलेला आहे. मी तिथूनच मुद्देमाल विकत घेतला आहे, असे सांगितले.

Web Title: Alcohol worth Rs 31,000 seized