शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

२५ गावांतून दारू व तंबाखू करणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : जिल्हा दारूबंदीला आमचे समर्थन असून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तंबाखू व दारूचे दुष्परिणाम लक्षात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

एटापल्ली : जिल्हा दारूबंदीला आमचे समर्थन असून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तंबाखू व दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता इलाक्यातील २५ गावांतून अवैध दारू व तंबाखू हद्दपार करण्याचा निर्णय जारावंडी पारंपरिक इलाका ग्रामसभेने घेतला आहे.

जिल्हा दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी तालुक्यातील सिरपूर येथे जारावंडी पारंपरिक इलाका ग्रामसभेची बैठक बाबूराव आतला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी इलाका अध्यक्ष मसरू पोटावी, शिशुपाल नरोटे, रमेश दुग्गा, मानसू नैताम, बिजेश नरोटे, जानू कोल्हा, डोलू कोल्हा, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांच्यासह २५ गावातील ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, गाव पाटील, भुम्या उपस्थित होते.

जिल्ह्यात शासकीय दारूबंदीनंतर शेकडो गावांनी आपल्या गावात दारूबंदी लागू केली. त्यामुळे दारूचा वापर कमी झाला. गावातील स्त्रिया व पुरूष संघटित होऊन गावाची दारूबंदी करीत आहेत. त्याचप्रमाणे जारावंडी पारंपरिक इलाका ग्रामसभेने देखील ठराव घेत महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करण्याची विनंती केली आहे. सोबतच इलाक्यातील २५ गावात देशी, विदेशी दारू विक्री बंद ठेवणे, पेसा कायद्याचा आधार घेत खर्राविक्री सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.