शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

अहो, आश्चर्यम; 30 वर्षांपासून त्या बोरवेलमधून वाहतंय 24 तास पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भूभाग. अशा भागात पाण्याचे स्रोत  फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरले आहे. ३० वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली गेली. गावातील वृद्ध सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलच्या पाण्याचे फवारे २० ते २५ फूट उंच जात असत. आज बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. मात्र मानवासोबतच वन्यजिवांची तृष्णा ही बोअरवेल भागवीत आहे. 

प्रमोद येरावारलोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बोअरवेलचं पाणी हवं तर हँडपंप मारावाच लागेल. हँडपंप न मारता बोअरवेलमधून सतत ३० वर्षे  पाण्याचा प्रवाह सुरू आहे, असं कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. नव्यानं घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्यात अशा दोन बोअरवेल आहेत की, ज्यांतून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरू असतो. मागील तीस वर्षांपासून ही बोअरवेल गावकरी, वनमजूर आणि वन्यजिवांची तहान भागवीत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव हे घनदाट जंगलाने वेढलेलं गाव. वन्यजिवांचा इथे मोठा आवास आहे. नुकतेच या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. याच अभयारण्यात दोन बोअरवेल अशा आहेत की, ज्यांतून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरू असतो. गावकरी व इथे येणाऱ्या वनमजुरांची तहान मागील ३० वर्षांपासून ही बोअरवेल भागवीत आहे. सतत सुरू असलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर आता वनविभागाने वन्यजिवांची तृष्णा भागविण्यासाठी केला आहे. वनतळ्यात या बोअरवेलचं पाणी सोडले जात आहे. अभयारण्यातील वाघ, तृष्णभक्षक प्राणी या पाण्याने तृष्णा भागवितात. तसे कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भूभाग. अशा भागात पाण्याचे स्रोत  फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरले आहे. ३० वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली गेली. गावातील वृद्ध सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलच्या पाण्याचे फवारे २० ते २५ फूट उंच जात असत. आज बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. मात्र मानवासोबतच वन्यजिवांची तृष्णा ही बोअरवेल भागवीत आहे. 

ब्रिटिश शिकारी कन्हारगाव गाठायचेअतिशय घनदाट अरण्य असलेले कन्हारगाव वनक्षेत्र ब्रिटिशकाळात शुटिंग ब्लाॅक म्हणून ओळखले जायचे. ब्रिटिश इथे शिकार करण्यासाठी यायचे. ब्रिटिशांनी इथे बांधलेले गेस्ट हाऊस आजही सुस्थितीत आहे. अनेकजण आजही येथे भेट देतात.

 

टॅग्स :Waterपाणी