शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

४० भूखंडधारकांवर कारवाई

By admin | Updated: March 13, 2015 00:05 IST

पाच वर्षांचा कालावधी उलटूनही एमआयडीसीतील भूखंडावर उद्योग स्थापन न करणाऱ्या भूखंडधारकारंवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ....

गडचिरोली : पाच वर्षांचा कालावधी उलटूनही एमआयडीसीतील भूखंडावर उद्योग स्थापन न करणाऱ्या भूखंडधारकारंवर एमआयडीसी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत एका वर्षात सुमारे ४० भूखंड परत घेतले आहेत. गडचिरोली येथील एमआयडीसीमध्ये एकूण १४६ भूखंड आहेत. सदर भूखंड उद्योगनिर्मिती करू इच्छीणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध करून दिली जातात. सदर भूखंड केवळ १० रूपये चौरस मिटर दराने एमआयडीसी प्रशासन उपलब्ध करून देते. भूखंड मिळण्यासाठी एखाद्या उद्योजकाने एमआयडीसीकडे अर्ज केल्यानंतर एमआयडीसी प्रशासन संबंधित उद्योजकाची मुलाखत घेतात. या मुलाखतीमध्ये सदर उद्योजक खरच उद्योग स्थापन करणार काय, उद्योग स्थापन करण्यासाठी त्याची आर्थिक बाजू लक्षात घेऊन भूखंड मंजूर केल्या जाते. भूखंड मंजूर झाल्यानंतर बरेचसे उद्योजक उद्योगच स्थापन करीत नाही. त्यामुळे सदर भूखंड रिकामा पडून राहण्याची शक्यता राहते. एमआयडीसी प्रशासनाने अशा भूखंडधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण सुरू केले आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे १५ भूखंडधारकांवर कारवाई करीत त्यांच्याकडेचे भूखंड परत घेण्यात आले आहेत. तर एका वर्षाच्या कालावधीत सुमारे ४० भूखंडधारकांवर कारवाई करून ते परत घेण्यात आले आहेत. उद्योगाला आवश्यक असलेल्या जमीन, वीज, पाणी या सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने एमआयडीसी स्थापना झाली आहे. अत्यंत कमी दरात जमीन उपलब्ध होत असल्याने काही नागरिक भूखंड घेतात. मात्र या भूखंडांचा उपयोग बऱ्याचवेळा राहण्यासाठी केला जात असल्याचे आढळून आले आहे. अशा भूखंडावर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करीत असेही भूखंड परत घेतले आहेत. (नगर प्रतिनिधी)नागपूर येथून चालतो कारभारगडचिरोली एमआयडीसीसाठी असलेले स्वतंत्र कार्यालय बंद करण्यात आले आहे. भूखंड घेऊ इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेणे, भूखंडांचे वाटप करणे आदी सर्व प्रक्रिया नागपूर येथील एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयातून पूर्ण केल्या जातात. गडचिरोली एमआयडीसीसाठी एकही कर्मचारी नाही. केवळ सर्वेअर नेमण्यात आला आहे. सर्वेअर केवळ बुधवारी गडचिरोली येथे येतात. स्वतंत्र कार्यालय नसल्याने उद्योजकांना भूखंडाविषयी मार्गदर्शन मिळत नाही. अनेकांना स्वस्त दरात एमआयडीसीत भूखंड मिळतात, हे सुध्दा माहितू नाही. त्यामुळे अनेक भूखंड रिकामे पडून आहेत. गडचिरोलीत स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.