शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडा न भरल्याने अपघाताचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:37 IST

गडचिराेली: गडचिराेली-आरमाेरी मार्गावरील रस्त्याच्या कडा मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे डांबरी रस्ता व बाजूचा रस्ता यांच्यामध्ये ...

गडचिराेली: गडचिराेली-आरमाेरी मार्गावरील रस्त्याच्या कडा मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे डांबरी रस्ता व बाजूचा रस्ता यांच्यामध्ये काही ठिकाणी जवळपास एक फुटाचे अंतर पडले आहे. एखादे वाहन डांबरी रस्त्याच्या खाली उतरल्यास ते उलटण्याचा धाेका आहे.

गडचिराेली-आरमाेरी या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. हा मार्ग पुढे नागपूरकडे जात असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. छत्तीसगड राज्यातून तेलंगणात जाणारी जड वाहने याच मार्गाने जातात. परिणामी जड वाहनांचीही वर्दळ राहते. ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या मार्गाची नेहमीच डागडुजी किंवा नूतनीकरण केले जाते. मार्गावर डांबर टाकल्यानंतर मार्गाची उंची वाढते. त्यामुळे डांबराच्या बाजूला मुरूम टाकणे आवश्यक राहते. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर मुरूम टाकण्यात आले नाही. त्यामुळे डांबरी रस्ता व बाजूचा रस्ता यांच्या उंचीत बरेच अंतर पडले आहे. काही ठिकाणी बाजूच्या रस्त्यापासून डांबरी रस्ता एक फूट उंच झाला आहे. दाेन माेठी वाहने समाेरासमाेर येऊन आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास वाहन डांबरी रस्त्याच्या खाली उतरवावे लागते. त्यावेळी वाहन उटलण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिराेली शहरापासून कठाणी नदीपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला काही दिवसांपूर्वी मुरूमाचे ढीग टाकण्यात आले. मात्र हा मुरूम अजूनपर्यंत पसरविण्यात आला नाही. या मुरूमाच्या ढिगावरच वाहने चढून अपघात हाेण्याची शक्यता आहे.