आधारविश्वने दिला काेराेना मृतकाला मुखाग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST2021-06-01T04:27:40+5:302021-06-01T04:27:40+5:30

गडचिराेली : मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील ७५ वर्षीय एका नागरिकाचा काेराेनामुळे ३० मे राेजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. आर्थिक ...

Aadharviswane gave Kareena to the deceased | आधारविश्वने दिला काेराेना मृतकाला मुखाग्नी

आधारविश्वने दिला काेराेना मृतकाला मुखाग्नी

गडचिराेली : मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील ७५ वर्षीय एका नागरिकाचा काेराेनामुळे ३० मे राेजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थतता दर्शविल्याने आधारविश्व फाऊंडेशनच्या सदस्यांनी अंत्यविधीचा खर्च उचलत मृतकाला मुखाग्नी दिला.

ज्या मृतकाचे कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास तयार नाहीत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आधारविश्व फाऊंडेशनच्या सदस्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व नगर परिषदेकडे केली हाेती. ३० मे राेजी मल्लेरा येथील एका इसमाचा काेराेनामुळे मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थतता दर्शवून तसे लिहून दिल्यानंतर नगर परिषदेने याबाबतची माहिती आधारविश्व फाऊंडेशनच्या सदस्यांना दिली.

आधारविश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष गीता हिंगे, ॲड. कविता माेहरकर व दिलशाद पिराणी यांनी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले लाकूड व इतर खर्च उचलत मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार केले. हे कार्य इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Aadharviswane gave Kareena to the deceased