८९८ क्विंटल धान परस्पर फेकला

By Admin | Updated: August 18, 2016 01:30 IST2016-08-18T01:30:33+5:302016-08-18T01:30:33+5:30

कोरची येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी संस्था बेडगावच्या वतीने

8 9 8 Quintals Paddy Interrupted | ८९८ क्विंटल धान परस्पर फेकला

८९८ क्विंटल धान परस्पर फेकला

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय : आदिवासी महामंडळाचा प्रताप
कोरची : कोरची येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी संस्था बेडगावच्या वतीने सन २०१४-१५ यावर्षात आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत एकूण २७१५.२० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी आॅगस्ट २०१५ मध्ये १८१६.७२ क्विंटल धानाची उचल करण्यात आली. उर्वरित ८९८.४८ क्विंटल धान गंजी लावून ताडपत्री झाकून सुरक्षित ठेवण्यात आले होते. धान्य खराब झाल्यामुळे सभोवतालच्या नागरिकाच्या आरोग्यास धोका होऊ शकतो, अशी सबब पुढे करून आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली व उपप्रादेशिक व्यवस्थापक कोरची यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता ८९८.४८ क्विंटल धान परस्पर फेकून दिल्याची गंभीर तेवढीच खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Web Title: 8 9 8 Quintals Paddy Interrupted