शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

७९ हजार रूपयांची दारू जप्त

By admin | Updated: July 18, 2015 01:33 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारूबंदी पथकाने गडचिरोली शहरातील दोन वॉर्डात गुरूवारी तसेच आरमोरी पोलिसांनी तालुका मुख्यालयालगतच्या रामाळा येथे ....

दारूबंदी पथकाची कारवाई : गडचिरोली व आरमोरीत पोलिसांची धाड; मुद्देमालाचा समावेश
गडचिरोली/आरमोरी : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारूबंदी पथकाने गडचिरोली शहरातील दोन वॉर्डात गुरूवारी तसेच आरमोरी पोलिसांनी तालुका मुख्यालयालगतच्या रामाळा येथे बुधवारी तीन हातभट्ट्यांवर धाड टाकून मोहफुलाची दारू जप्त केली. दोन्ही ठिकाणाहून ७९ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गडचिरोली शहरातील रामपुरी वॉर्डात अवैधरित्या दारूविक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळताच धाड टाकून १८० मिली ३ हजार ८०० रूपये किमतीच्या ३८ निपा, ९० मिली तीन हजार रूपये किमतीच्या ६० निपा अशी एकूण ६ हजार ८०० रूपयांची देशी दारू जप्त केली. रामपुरी वॉर्डातील रवींद्र टेकाम, महेश टेकाम हे अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत होते. पोलिसांनी पंचासमक्ष दारू पकडून आरोपींना दारूसह ताब्यात घेतले. तसेच शहरातील नेहरू वॉर्डात कृष्णा सीताराम बिंदे, शकुंतला मेश्राम हे अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून देशी दारू व दुचाकी असा एकूण ५७ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कृष्णा बिंदे, शकुंतला मेश्राम यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार शंकर डांगे, मिर्गे, बाला, राठोड, ढवळे, दुधलकर, दुग्गा, तायडे यांनी केली.
आरमोरीनजीकच्या रामाळा येथे तीन ठिकाणी हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी घटनास्थळी धाड टाकून १५ हजार रूपयांची दारू जप्त केली. त्याबरोबरच संगीता हरिचंद्र राऊत, वनिता दामोदर शेंद्रे, इंदू अजय नेवारे सर्व रा. रामाळा यांना अटक केली आहे. रामाळा-ठाणेगाव मार्गावरील लगतच्या झुडूपात आरोपी हातभट्टी लावून मोहाची दारू काढून त्याची विक्री करीत होते. बुधवारी पोलिसांनी घटनास्थळ गाठून संगीता राऊत यांच्याकडून ४० लिटर मोहफूल दारू व ५० किलो मोहफूल असा एकूण ६ हजार ५०० रूपयांचा माल वनिता दामोदर शेंद्रे यांच्याकडून ३० लिटर मोहफूल दारू व ४० किलो मोहफुलाचा सडवा, असा एकूण ४ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल तसेच आरोपी इंदू नेवारे यांच्याकडून ३० लिटर मोहफुलाच्या दारूसह ४० किलो सडवा असा एकूण ४ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही ठिकाणाहून १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर दारूबंदी कायदा ६५ (ई) (क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई प्रभारी ठाणेदार बच्छलवार, उंदीरवाडे, गोकुल मेश्राम, कन्नाके, म्हशाखेत्री यांनी केली.