चामोर्शीत ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST2021-09-06T04:40:15+5:302021-09-06T04:40:15+5:30

रक्तदान शिबिराचे उद्घाटन वारसा झोनचे प्रमुख किशन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वडसा झोनचे क्षेत्रीय ...

70 blood donors donated blood in Chamorshi | चामोर्शीत ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान

चामोर्शीत ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान

रक्तदान शिबिराचे उद्घाटन वारसा झोनचे प्रमुख किशन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वडसा झोनचे क्षेत्रीय संचालक हरीश निरंकारी, अशोक बोरकुटे, खुशाल झोडगे, जीवनकला बोरकुटे, आनंद गण्यारपवार, दिलीप चलाख आदी उपस्थित होते.

काराेनाचे सर्व पाळून परिसरातील भाविकांनी रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळाचे भोजराम लंजे, फुलचंद गेडाम, निकेश खोब्रागडे, देवनाथ धोडरे, घनश्याम बोदलकर,नाजूक येलमुले, रोशन नवले, सोमाजी करेवार, गणेश कंकलवार, वंदना धोडरे, विद्या बोरकुटे, रंजना रामटेके, कोमरु मिडपल्लीवर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक बोरकुटे यांनी तर आभार सुभाष ढाली यांनी मानले.

050921\1335-img-20210905-wa0001.jpg

रक्तदान फोटो

Web Title: 70 blood donors donated blood in Chamorshi