दारूमुक्त होण्याचा ५५ रुग्णांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:32+5:302021-01-17T04:31:32+5:30

आलापल्ली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २१ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. सिरोंचातील रामाराव दुधीवार यांच्या घरी असलेल्या तालुका ...

55 patients determined to be alcohol free | दारूमुक्त होण्याचा ५५ रुग्णांचा निर्धार

दारूमुक्त होण्याचा ५५ रुग्णांचा निर्धार

आलापल्ली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २१ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. सिरोंचातील रामाराव दुधीवार यांच्या घरी असलेल्या तालुका कार्यालयात ६, चामोर्शी येथील कार्यालयात १५ रुग्णांवर तर कुरखेडातील तालुका कार्यालयात १३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या चार तालुक्यात क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ५५ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला.

क्लिनिकच्या भेट देणाऱ्या रुग्णांना समुपदेशन केले जाते. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना सांगण्यात येते. मुक्तिपथ तालुका कार्यालयांमध्ये ठराविक दिवशी क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: 55 patients determined to be alcohol free