आष्टी नाक्यावर ५० पेट्या दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST2021-11-07T05:00:00+5:302021-11-07T05:00:51+5:30

गाेंडपिंपरी मार्गे चारचाकी वाहनाने आष्टी येथे दारू आणली जात असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. आष्टी चेक पोस्ट फाॅरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करून एमएच ३३ व्ही ७१५१ क्रमांकाचे बोलेरो वाहन थांबवून चाैकशी केली असता, त्यामध्ये देशीदारूच्या ५० पेट्या आढळून आल्या. दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे. दाेघे फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये नूर अब्दुल रफीक शेख (वय २९ वर्षे), सोहेल शफीक शेख (वय २५ वर्षे) दाेघेही रा. अहेरी हे दोघे मिळाले आहेत.

50 cases of liquor seized at Ashti Naka | आष्टी नाक्यावर ५० पेट्या दारू जप्त

आष्टी नाक्यावर ५० पेट्या दारू जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : स्थानिक पाेलिसांनी प्रवासी वाहनातून सुमारे ५० पेट्या देशीदारू पकडली आहे. त्याची किंमत तीन लाख रुपये आहे. ही कारवाई शनिवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. 
गाेंडपिंपरी मार्गे चारचाकी वाहनाने आष्टी येथे दारू आणली जात असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. आष्टी चेक पोस्ट फाॅरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करून एमएच ३३ व्ही ७१५१ क्रमांकाचे बोलेरो वाहन थांबवून चाैकशी केली असता, त्यामध्ये देशीदारूच्या ५० पेट्या आढळून आल्या. दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे. दाेघे फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये नूर अब्दुल रफीक शेख (वय २९ वर्षे), सोहेल शफीक शेख (वय २५ वर्षे) दाेघेही रा. अहेरी हे दोघे मिळाले आहेत. फरार आराेपींचा पाेलीस शाेध घेत आहेत. आरोपींविरोधात आष्टी पोलीस स्टेशनमध्ये मदाका ६५(अ) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठाेड यांनी स्वतः  आपल्या चमूसह केली. पथकात बेगला दुर्गे, रत्नाकर खेकारे, चालक विलास दर्रो यांचा समावेश हाेता. पुढील तपास पो.नि. कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर करमे करीत आहेत.

 

Web Title: 50 cases of liquor seized at Ashti Naka