शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धानाेरात ४९५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क धानाेरा : मुदत संपलेल्या ४४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घाेषित करण्यात आला. यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अविराेध ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

धानाेरा : मुदत संपलेल्या ४४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घाेषित करण्यात आला. यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अविराेध निवडणूक झाली दाेन ग्रामपंचातीमध्ये नामांकनच प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता ३० ग्रामपंचायतीमध्ये २०० जागांसाठी निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत एकूण ४९५ उमेदवार रिंगणात आहेत.

४४ ग्रामपंचायतीमध्ये ३३४ सदस्यांकरीता निवडणूक कार्यक्रम घाेषित झाला हाेता. यामध्ये सात सदस्यीय ३२ ग्रामंचायती, ९ सदस्य असलेल्या ११ ग्रामपंचायती तर ११ सदस्य असलेली एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. १८९ महिला व १४५ पुरूष मतदार निवडून दिले जाणार हाेते. परंतु कुलभटी व कटेझरी नंबर २ या सात सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी एकही नामांकन दाखल झाले नाही. हेटी, कामनगड, रेखाटाेला, कुथेगाव, दराची, देवसूर, गिराेला, काेंदावाही, निमगाव, सावंगा बुज, माेहगाव, चिचाेडा या १२ ग्रामपंचायतींची निवडणूक अविराेध झाली. आता मात्र ३० ग्रामपंचायतमध्ये २०० जागांसाठी मतदान हाेणार आहे. एकूण ४९५ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यात १४ हजार २०८ महिला व १४ हजार ४८९ पुरूष मतदार आहेत.

चिचाेडा व महागाव या सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये एकच नामांकन दाखल झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक कायम राहणार आहे. सावंगा बुज, कुथेगाव, दराची या ठिकाणी प्रत्येकी पाच नामांकन दाखल झाले आहेत. रेखाटाेला, गिराेला, कामनगड या सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी सहा जागा अविराेध निवडून आले आहेत. मुस्का येथे ९ जागांसाठी १० नामांकन आल्याने एका जागेवर निवडणूक हाेईल. निमगाव व तुकूम येथे प्रत्येकी सात जागांकरीता प्रत्येकी तीन नामांकन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे चार जागांसाठी मतदान हाेणार आहे.