गडचिरोली - झारखंडच्या चतरा आणि हजारीबाग जिल्ह्यांच्या सीमावर्ती बटुका परिसरात झालेल्या चकमकीत १५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला सबझोनल कमांडर सहदेव महतो याच्यासह चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना शुक्रवारी यश आले.
कोब्रा बटालियन आणि स्थानिक पोलिसांनी या भागात हजारीबागचे पोलिस अधीक्षक सुमित कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम हाती घेतली होती. जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना पाहताच अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी तत्काळ मोर्चेबांधणी करत चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे दोन तास चाललेल्या या थरारक धुमश्चक्रीत चार नक्षलवादी जागीच ठार झाले, तर काही जखमी नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाल्याची शक्यता आहे.
‘मिसिर बेसरा’साठी सापळा, पण देतोय हुलकावणी... गेल्या तीन दिवसांत झालेल्या आयईडी स्फोटांत सहा जवान जखमी झाल्याने परिसरात तणाव होता. मात्र आजच्या या मोठ्या यशामुळे सुरक्षा दलांचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. केंद्रीय समिती सदस्य ‘मिसिर बेसरा’साठी जवानांनी सारंडा जंगलात सापळा रचला आहे. मात्र, त्याने आतापर्यंत जवानांना हुलकावणी दिली आहे. त्याच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१५ नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्णगोंदिया : मध्य प्रदेश, महाराष्ट्र-छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास ऊर्फ अनंत नागपुरे यांच्यासह १४ स्त्री व पुरुष नक्षलवाद्यांनी येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यांची कायदेशीर आत्मसमर्पणाची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.
अशी आहेत मृतांची नावे मृतांमध्ये १५ लाख रुपये बक्षीस असलेला माओवादी शहदेव महतो, महिला माओवादी नताशा, एरिया कमांडर बुधन करमाली आणि बुद्धदेव यांचा समावेश आहे. घटनास्थळाहून दोन एके- ४७ रायफल्स, एक इन्सास, एक कोल्ट एआर रायफल, तसेच जिवंत काडतुसे, देशी बनावटीची शस्त्रे आणि नक्षलवादी साहित्य जप्त केले आहे.
Web Summary : In Gadchiroli, security forces eliminated four Maoists, including commander Sahdev Mahato, during a two-hour gunfight. Weapons and ammunition were seized. Separately, 15 Naxalites surrendered, completing legal procedures.
Web Summary : गढ़चिरौली में सुरक्षा बलों ने दो घंटे की मुठभेड़ में कमांडर सहदेव महतो सहित चार माओवादियों को मार गिराया। हथियार और गोला-बारूद जब्त किए गए। अलग से, 15 नक्सलियों ने आत्मसमर्पण कर दिया, कानूनी प्रक्रिया पूरी।