शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या ११६६ जागांसाठी २८८४ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST

दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत ...

दुसऱ्या टप्प्यातील चामोर्शी, अहेरी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या सहा तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींमध्ये १४५४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बुधवारी (दि.६) अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. २३० जागांवर एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिल्यामुळे त्यांची अविरोध निवड होत आहे. याशिवाय ५८ जागांसाठी कोणीही अर्ज केला नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात ११६६ जागांसाठीच मतदान होणार आहे. त्यासाठी २८८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

(बॉक्स)

आठ ग्रामपंचायतींना मिळणार दोन कोटींचा निधी

दुसऱ्या टप्प्यातील भामरागड वगळता इतर पाचही तालुक्यात काही ग्रामपंचायती अविरोध निवडल्या गेल्या. त्यात चामोर्शी तालुक्यातील दोन आहेत. इतर चार तालुक्यातील ८ ग्रामपंचायती अहेरी विधानसभा मतदार संघातील असल्यामुळे त्यांना आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी २५ लाखांचा निधी मिळेल. त्या ग्रामपंचायतींमध्ये अहेरी तालुक्यातील मांडरा, मूलचेरा तालुक्यातील देवदा आणि वेंगलूर, एटापल्ली तालुक्यातील मानेवाडा आणि वाघेझरी, तसेच सिरोंचा तालुक्यातील रामंजपूर (वेस्टलँड), कोरलामाल आणि कोपेला या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक सदस्य अविरोध

अविरोध निवडल्या जात असलेल्या २३० उमेदवारांमध्ये सर्वाधिक ११४ सदस्य चामोर्शी तालुक्यातील आहेत. याशिवाय अहेरी १०, मूलचेरा २६, एटापल्ली ४० आणि सिरोंचा तालुक्यातील ४० आहेत. याशिवाय रिक्त राहणाऱ्या जागांमध्ये चामोर्शी तालुक्यातील २७, मुलचेरा २०, एटापल्ली १०, भामरागड तालुक्यातील १ आहे.