शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षांनंतर नळाचे पाणी पोहोचले

By admin | Updated: June 22, 2016 00:51 IST

राजनगरी अहेरीच्या गुप्पा परिसरात गेल्या २७ वर्षांत कोणत्याही प्रकारची नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली नाही.

गुप्पा परिसरातील नागरिक आनंदी : नगरसेवकाला पहिला पाण्याचा ग्लास भरविलाअहेरी : राजनगरी अहेरीच्या गुप्पा परिसरात गेल्या २७ वर्षांत कोणत्याही प्रकारची नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली नाही. तसेच या परिसरात नव्याने पाईपलाईन टाकून पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन या वॉर्डाचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सातत्त्याने पाठपुरावा करून या परिसरासाठी विशेष नळ योजना मंजूर करून घेतली. त्यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर गुप्पा परिसरातील नागरिकांना नळाचे पाणी मिळाले. मंगळवारी अमोल मुक्कावार यांनी गुप्पा परिसरातील नळाची विधीवत पूजा करून पाणीपुरवठा सुरू केला. विशेष म्हणजे यावेळी नळाचे पाणी घेतलेल्या महिलांनी सदर नळाच्या पाण्याचा पहिला ग्लास नगरसेवक मुक्कावार यांना पाजला. यापूर्वी गुप्पा परिसरात कोणत्याही प्रकारची नळ योजना नसल्याने नागरिकांना हातपंप अथवा विहिरीचे पाणी भरावे लागत होते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावल्यानंतर येथील विहीर कोरडी पडत होती. तसेच हातपंपाला पाणी येत नव्हते. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड पायपीट होत होती. विशेष नळ योजना मंजूर करून ती कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये नगर सेवक अमोल मुक्कावार यांचा मोलाचा वाटा आहे. मंगळवारी प्रथमच गुप्पा परिसरात नळाद्वारे पाणी आल्याने या परिसरातील नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. नगर सेवक अमोल मुक्कावार यांचे पुष्पगुच्छ देऊन वॉर्डातील नागरिकांनी स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनुराग जक्कोजवार, अमोल श्रीरामवार आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.गुप्पा परिसरात दरवर्षी नळ पाणीपुरवठा योजनेअभावी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. निवेदन देऊन अनेकदा पाठपुरावा केला. मात्र साऱ्या लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले होते. (शहर प्रतिनिधी)अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यशनगरसेवक अमोल मुक्कावार यांनी गुप्पा परिसरात भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यापूर्वीही ते या भागातील समस्यांप्रती ज्ञात होते. नगरसेवक होण्यापूर्वी सामाजिक कार्य करताना गुप्पा परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येची दखल मुक्कावार यांनी घेतली. त्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर मुक्कावार यांनी गुप्पा परिसरातील पाणीटंचाई प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे गुप्पा परिसरात विशेष नळ योजना मंजूर करण्यासंदर्भात त्यांनी प्रस्ताव सादर केला होता. मात्र यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सदर नळ योजनेच्या मंजुरीची प्रक्रिया काही दिवस थंडबस्त्यात होती. त्यानंतर मुक्कावार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाकडे प्रचंड पाठपुरावा करून गुप्पा परिसरासाठी विशेष नळ योजना मंजूर करून घेतली. नगरसेवक मुक्कावार यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यामुळे गुप्पा परिसरात नळ योजना कार्यान्वित झाली.