नव्याने २७ कोरोनाबाधित आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST2021-03-10T04:36:38+5:302021-03-10T04:36:38+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ९७२६ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९४६२ वर पोहोचली, तसेच सध्या १५६ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ...

27 new coronaviruses were found | नव्याने २७ कोरोनाबाधित आढळले

नव्याने २७ कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ९७२६ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९४६२ वर पोहोचली, तसेच सध्या १५६ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२९ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण १.६० टक्के, तर मृत्युदर १.११ टक्के झाला.

नवीन २७ बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील १६, तर अहेरी तालुक्यातील १, आरमोरी तालुक्यातील २, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, कोरची तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील १, वडसा तालुक्यातील ४, जणांचा समावेश आहे, तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३३ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ३१, अहेरी १, कुरखेडा १ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील श्री कॉम्प्युटर धानोरा रोड परिसर ४, स्थानिक २, साईनगर २, कोटगल १, नवेगाव २, स्नेहनगर १,कॅम्प एरिया २, कुर्बी १, तर चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये घोट १, अहेरी तालुक्यातील आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक १, इंदिरानगर वैरागड १, धानोरा तालुक्यातील आश्रम शाळा गीरोला १, कोरची तालुक्यातील पी.एस. १, कुरखेडा तालुक्यातील स्थानिक १, वडसा तालुक्यातील हनुमान वाॅर्ड १, गांधी वाॅर्ड १, कुरूड एकाचा समावेश आहे, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये एकाचा समावेश आहे.

Web Title: 27 new coronaviruses were found