शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षात २,५३० प्रकरणे निकाली

By admin | Updated: January 10, 2015 01:19 IST

गडचिरोली येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या समाधान कक्षाच्यामार्फत गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत पोलीस अधिकारी ...

गडचिरोली : गडचिरोली येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या समाधान कक्षाच्यामार्फत गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या दोन हजार ५३० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात पोलीस विभागात विविध पदांवर अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शांतता, सुव्यवस्था, बंदोबस्त ठेवण्यासोबतच गुन्हेगारीला रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्ह्याच्या पोलीस दलाला करावे लागते. पोलीस विभागात कामाची व्यस्तता अधिकच राहते. अशा परिस्थितीत कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतील अनेक अडचणी मार्गी लावण्यासाठी वारंवार रजा घेऊन प्रयत्न करणे शक्य होत नाही. त्यांना अडचणींचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील संबंधीत लिपिक वा अन्य कर्मचाऱ्यांकडे वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, कार्यालयात वारंवार यावे लागू नये, कमी वेळात जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली निघावेत, या हेतूने तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी २६ जुलै २०१२ ला समाधान कक्ष सुरू केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील समाधान कक्षात प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व दोन पोलीस कॉन्स्टेबल कार्यरत आहेत. विशेष म्हणजे हे समाधान कक्ष २४ तास सुरू असते. समाधान कक्षात ८८०६३१२१०० हा हेल्पलाईन भ्रमणध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांना थेट या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या मांडता येतात. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जातात.२६ जुलै २०१२ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत समाधान कक्षात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भविष्य निवार्ह निधीचे एकूण २१३ प्रकरणे प्राप्त झाली. सर्वच्या सर्व प्रकरण निकाली काढण्यात आली. वाहतूक खर्चाचे प्राप्त झालेले १६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. बदलीचे १३० प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १२७ प्रकरणे तसेच रजा रोखीकरणाचे प्राप्त २९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. पोलिसांच्या प्रवासभत्ता (एल.टी.सी) चे आतापर्यंत ७८ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी ७७ प्रकरणे तर राशन भत्ता बिलाचे प्राप्त सर्वच ५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अज्ञांकित कक्षाचे ३५ प्रकरणे प्राप्त झाली. यात अर्जकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षकाशी संवाद साधून ३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. साप्ताहिक रजेच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांनी काम केल्यास त्यांना या दिवसाचे वेतन दिले जाते.साप्ताहिक रजेबाबत प्राप्त झालेले सर्वच २२ प्रकरणे तसेच अर्जित रजेचे प्राप्त सर्वच २०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. समाधान कक्षामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)