शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

२५ मंडळांकडे अधिकृत वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:39 PM

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी चोरीची वीज न घेता रितसर अर्ज करून अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी,

ठळक मुद्देकारवाईचे संकेत : ६८१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महावितरणच्या वीज जोडणीकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी चोरीची वीज न घेता रितसर अर्ज करून अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, यासाठी महावितरणच्या वतीने गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी वीज दर आकारण्यात आले आहे. याशिवाय अशा प्रकारची वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वतीने जनजागृती करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील एकूण ७०६ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ २५ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. उर्वरित ६८१ मंडळांनी वीज जोडणीकडे पाठ फिरविली आहे.२५ आॅगस्ट शुक्रवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. त्यापूर्वीच महावितरणच्या वतीने सार्वजनिक मंडळांनी सवलतीच्या दरात अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या बाबतची सूचना शांतता समितीच्या बैठकीत देण्यात आली. मात्र महावितरणच्या अधिकृत वीज जोडणीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा एकूण ७०६ सार्वजनिक गणेश मूर्तींची मंडळांतर्फे प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यामध्ये ५४५ सार्वजनिक व १६१ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. एकूण ७०६ सार्वजनिक मंडळांपैकी केवळ २५ मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे. यामध्ये गडचिरोली उपविभागातील सहा व आलापल्ली उपविभागातील १९ सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. उर्वरित ६८१ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणीकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. गणेशोत्सवासोबतच गणेश विसर्जनाच्या काळात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. अधिकृत वीज जोडणी घेतली नसल्याने जीवित व वित्त हानीचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या पथकातर्फे चोरीची वीज वापरणाºया मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे. आता महावितरणचे पथक शहरी भागात वीज पुरवठ्याची चौकशी करणार आहेत.मंडळावर कारवाई होणार काय?सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांनी चोरीची वीज न वापरता अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेऊन सुरक्षितरित्या विद्युतीकरण करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली नाही. याबाबतची चौकशी करण्यासाठी महावितरणच्या वतीने स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले आहे. सदर पथक आता गावागावात जाऊन चौकशी करणार आहे. मंडळावर कारवाई होते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.असा आहे वीज दरगणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घेणाºया सार्वजनिक मंडळांना ४ रूपये ३१ पैसे प्रती युनिट अस्थिर आकार असा दर ठेवण्यात आला आहे. उत्सव मंडळांना प्रती जोडणी प्रतीमाह ३३० रूपये स्थिर आकार आकारण्यात येणार आहे.ब्रह्मपुरी उपविभागात नऊ कनेक्शनगडचिरोली जिल्ह्याच्या वीज विभागामध्ये गडचिरोली, आलापल्ली, ब्रह्मपुरी या तीन उपविभागाचा समावेश आहे. ब्रह्मपुरी उपविभागात एकूण नऊ गणेश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेतले आहे.सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घ्यावी, यासाठी वाहन फिरवून ध्वनीक्षेपकाद्वारे जिल्हाभरात जनजागृती करण्यात आली होती. मात्र अधिकृत वीज जोडणीसाठी सार्वजनिक गणेश मंडळाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आलापल्ली, ब्रह्मपुरी, गडचिरोली उपविभाग मिळून एकूण ३४ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी गणेशोत्सवासाठी घेतली आहे. वीज तारांवर आकडे टाकून वीज घेणाºया संबंधित मंडळाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मंडळांनी उत्सवासाठी एखाद्या घरातून वीज पुरवठा घेतला असल्यास अशा घर मालकाकडून महावितरणतर्फे अतिरिक्त दंड वसूल केला जाणार आहे. त्यापूर्वी संबंधित घरगुती वीज ग्राहकांना नोटीस पाठविण्यात येईल.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंतामहाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी गडचिरोली