शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

२२ उपकेंद्र भाड्याच्या घरात

By admin | Updated: January 3, 2015 23:02 IST

जिल्ह्यातील ३७६ आरोग्य उपकेंद्रांपैकी सुमारे २२ उपकेंद्रांना इमारती नसल्याने सदर उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसुती कक्षाची

आरोग्य सुविधांचा अभाव : रूग्ण तसेच गरोदर मातांची गैरसोय
गडचिरोली : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य उपकेंद्रांपैकी सुमारे २२ उपकेंद्रांना इमारती नसल्याने सदर उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसुती कक्षाची सुविधासुध्दा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने २० किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने दोन ते तीन गावांसाठी आरोग्य उपकेंद्राची निर्मिती केली. या आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक, दोन परिचारिका व अंशाकालीन स्त्री परिचराची नेमणूक करण्यात आली आहे. या उपकेंद्रातील परिचारिका लहान मुलांना लसीकरण करणे, गरोदर मातांची तपासणी करणे आदी कामे करतात. त्याचबरोबर उपकेंद्रात प्रसूती कक्ष राहत असल्याने प्रसूतीसाठी महिलेला भरती केले जाते. एकंदरीतच गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य उपकेंद्राद्वारे केले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३७६ आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र यातील २२ उपकेंद्रांना इमारतीच नाही. त्यामुळे सदर उपकेंद्र गावातील एका लहानशा भाड्याच्या खोलीमध्ये चालविले जात आहेत. या खोलीमध्ये रूग्णाला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा मिळण्यास अडचण जात आहे.
प्रसूतीदरम्यान बाल व माता मृत्यू थांबविण्यासाठी शासनाने प्रत्येक उपकेंद्रात प्रसुती कक्ष स्थापन केले आहे. मात्र या उपकेंद्रांमध्ये प्रसूती कक्षाची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे गरोदर मातांना जवळपासच्या दुसऱ्या उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे लागते. गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये रस्तेसुध्दा पोहोचली नाहीत. अशा गावातील गरोदर मातेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत.
ज्या इमारतींमध्ये उपकेंद्राचा कारभार थाटण्यात आला आहे. त्यातील काही इमारती कौलारू आहेत. सदर इमारती जुन्या असल्याने पावसाळ्यात गळतात. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या परिचारिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींकडून दिले जाते. मात्र आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतीच झाल्या नसल्याने नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा कशी काय पोहोचणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासन रूग्णालयात प्रसूतीची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच ज्या गरोदर माता प्रसूतीसाठी उपकेंद्रात दाखल होत आहेत. मात्र या उपकेंद्रात प्रसूती कक्षच नसल्याने त्यांना पीएचसीमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे या उपकेंद्रांच्या इमारतीचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी नागरिकांकडून आहे. (नगर प्रतिनिधी)