शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

१७१ किमींच्या वीज वाहिन्यांची दुरूस्ती

By admin | Updated: July 17, 2015 01:41 IST

वीज तारा जमिनीकडे लोंबकळण्यामुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्किंग होण्याची भीती राहते. त्याचबरोबर प्राणी किंवा मानवाचा स्पर्श होऊन अनुचित घटना घडण्याचीही शक्यता राहते. ...

तारांना दिला ताण : वीज महावितरणाची पावसाळ्याची तयारी; मुख्य लाईनकडे विशेष लक्ष
दिगांबर जवादे गडचिरोली
वीज तारा जमिनीकडे लोंबकळण्यामुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्किंग होण्याची भीती राहते. त्याचबरोबर प्राणी किंवा मानवाचा स्पर्श होऊन अनुचित घटना घडण्याचीही शक्यता राहते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गडचिरोली व आलापल्ली विभागातील सुमारे १७१ किलोमीटरच्या वीज वाहिन्यांना ताण देऊन त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भूभाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. या जंगलातूनच वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. परिणामी वीज कंपनीचा दुरूस्तीचा खर्च इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. झाडांवर फांदी पडल्याने खांब वाकतात. त्याचबरोबर काही कालावधीनंतर तार आपोआप सैल होतो. तार खाली लोंबकळत राहते. दोन तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्कींग होण्याची भीती राहते. स्पार्कींगमुळे आग लागते व विद्युत पुरवठाही खंडीत होतो. त्याचबरोबर विद्युततारा जमिनीकडे अधिकच लोंबकळल्यास प्राणी किंवा मानव यांचा स्पर्श होऊन जीव जाण्याचा धोकाही निर्माण होतो.
हे सर्व धोके लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीच्या मार्फतीने पावसाळ्यापूर्वी वीज तारांना तान देणे सुरू केले आहे. मान्सूनपूर्वपर्यंत गडचिरोली विभागातील ११२ किमी व आलापल्ली विभागातील ५९ किमी असे एकूण १७१ किमीच्या ११ केव्ही वीज वाहिन्यांना तान देऊन त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत.
विद्युत विभागाच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात हजारो किमीचे विद्युत जाळे निर्माण करण्यात आले आहेत. वीज विभागाच्या मार्फतीने १७१ किमी वीज वाहिन्यांना तान देण्यात आले असले तरी शेकडो गावांमधील अजुनही अनेक खांबांवरील तार लोंबकळत असल्याचे दिसून येते. वीज विभागाचे कर्मचारी मुख्य लाईनकडे विशेष लक्ष देतात. मात्र दुर्गम भागातील वीज दुरूस्तीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणाने हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील इन्सुलेटर व जंपर बदलले
वीज खांबात विजेचा प्रवाह सुरू होऊ नये यासाठी इन्सुलेटर हे उपकरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. इन्सुलेटर फुटल्यास वीज प्रवाह खंडीत होतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. जंगलात असलेल्या खांबावरील इन्सुलेटर फुटल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इन्सुलेटरची दुरूस्ती करण्यास विशेष प्राधान्य दिल्या जाते. जूनअखेरपर्यंत गडचिरोली विभागातील ११९ तर आलापल्ली विभागातील १५६ इन्सुलेटर बदलवून ते नीट बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर १२९ ठिकाणचे जंपर बदलविण्यात आले आहेत.
१० रोहित्रांमध्ये टाकले नवीन आॅईल
गावाला वीज पुरवठा करण्यात रोहित्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. त्यामुळे रोहित्रामधील बिघाड गाववासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन वीज विभागाने जिल्ह्यातील १० रोहित्रांची दुरूस्ती केली आहे. त्यामधील जुने आईल काढून त्या ठिकाणी नवीन आॅईल टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या रोहित्रामध्ये कमी आॅईल आहे, त्याही रोहित्रांमध्ये आॅईल टाकण्यात आले. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे.
११८ खाबांना ताण
गडचिरोली विभागातील १४ व आलापल्ली विभागातील १०४ अशा एकूण ११८ खांबांना ताण देऊन ते सरळ करण्यात आले. वादळ वारा व तारांवर झाड कोसळण्यामुळे खांब वाकण्याच्या घटना घडतात. वाकलेल्या खांबांना तान देऊन दुरूस्त केले जाते.