शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

१७० अतिक्रमणधारकांना नोटीस

By admin | Updated: May 14, 2016 01:16 IST

साकोली-देसाईगंज-गडचिरोली-सिरोंचा या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे सहायक अभियंता

सहायक अभियंत्यांची कारवाई : साकोली-देसाईगंज-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गदेसाईगंज : साकोली-देसाईगंज-गडचिरोली-सिरोंचा या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे सहायक अभियंता श्रीकांत सुखदेवे यांनी देसाईगंज शहरातील १७० अतिक्रमणधारकांना ११ मे रोजी नोटीस बजावली.देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी च्या महामार्गाच्या जमिनीवर किमी ६३/२०० वर उजव्या/डाव्या बाजुस ४ मीटर बाय ३ मीटर जागेवर अनधिकृतरीत्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमणधारकांना उत्तरवादी ठरवून नोटीस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अनधिकृत कब्जा हटविण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. सदर नोटीस अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सूचनेतील राष्ट्रीय राज्यमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ च्या नियम २६ उपकलम (२) नुसार सहायक अभियंत्यांनी नोटीस बजावली आहे. नोटीस पाठविल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र. १४ नागपूर येथे सदर जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी देण्यात आली आहे. अशा अभिवेदनधारकांना १६ मे रोजी पूर्ण सुनावणी करण्यात येणार आहे. या नोटीसचे अनुपालन करण्यात अयशस्वी ठरल्यास राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी व वाहतूक) अधिनियम २००२ च्या कलम २६ उपकलम (२) नुसार शास्ती लादून अतिक्रमण निष्काशीत केले जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान देसाईगंज शहरात नोटीस पाठविल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ माजली आहे.अतिक्रमणधारकांनी अनधिकृत अतिक्रमण स्वत: काढून टाकावे, असे आवाहन सहायक अभियंता श्रीकांत सुखदेवे यांनी केले आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच अतिक्रमण हटविले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे सहायक अभियंता श्रीकांत सुखदेवे यांनी दिली आहे.