शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

१७९४ कुटुंबांना शौचालय

By admin | Updated: December 25, 2015 02:02 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाने गडचिरोली पालिकेला शहरात तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे.

तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट : पालिकेकडे १ हजार ३९७ अर्ज प्राप्तदिलीप दहेलकर गडचिरोलीस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाने गडचिरोली पालिकेला शहरात तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे. गडचिरोली शहरात अद्यापही १ हजार ७९४ कुटुंबांकडे शौचालय नाही. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील १ हजार ७९४ कुटुंबांना शासनाच्या अनुदानातून शौचालय मिळणार आहे. शौचालय योजनेसाठी आतापर्यंत नगर पालिकेकडे १ हजार ३९७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर योजनेची पालिकेच्या वतीने युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू झाली आहे.सर्व शहरांमध्ये नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिले जात आहे. स्वच्छतेचे सदर ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून पात्र लाभार्थी कुटुंबास वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. त्यानुसार गडचिरोली नगर पालिकेने आॅगस्ट महिन्यापासून या योजनेच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे. प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालय असावे जेणेकरून शहरी नागरिकांना शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्या तसेच शहरातील वातावरणही स्वच्छ असावे, हा उद्देश ठेवून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामाची मोहीम राबविली जात आहे. नगर पालिका प्रशासनाकडून पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम मिळालेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले आहे. तर अद्यापही शहरातील अनेक भागातील शौचालय नसलेले कुटुंब प्रमुख नगर पालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करीत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी शहरात शौचालय असलेल्या व नसलेल्या कुटुंबाविषयी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील गोकुलनगर, विवेकानंदनगर, रामनगर, लांजेडा, इंदिरानगर, विसापूर, विसापूर टोली व कॉम्पलेक्स भागातील जवळपास पावणे दोन हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे दिसून आले. या सर्व कुटुंबांना आता योजनेंतर्गत शौचालय मिळणार आहे.