शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतर्फे १६० जोडप्यांना सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन या योजनेच्या अर्थसहाय्य रकमेत वाढ केली. जि.प.च्या समाजकल्याण कार्यालयात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे एकूण २४५ प्रस्ताव प्राप्त झाले.

ठळक मुद्दे७९.८५ लाखांचे धनादेश वाटप : आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जिल्ह्यातील जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जि.प.च्या सभागृहात बुधवारी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे अध्यक्ष अजय कंकडालवार होते.प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रमेश बारसागडे, जि.प.सदस्य गीता कुमरे, लता पुंगाटी, समाजकल्याण अधिकारी माणिक चव्हाण आदी उपस्थित होते.१२ जानेवारी १९९६ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील जातीयता व भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्णय घेऊन या योजनेच्या अर्थसहाय्य रकमेत वाढ केली. जि.प.च्या समाजकल्याण कार्यालयात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे एकूण २४५ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १६० प्रस्ताव निकाली काढून प्राप्त निधीनुसार ७९.८५ लक्ष रुपये अर्थसहाय्य वाटपावर खर्च करण्यात आले आहे. जि.प.समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ६० पेक्षा अधिक जोडपे प्रत्यक्ष हजर होते.प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी माणिक चव्हाण, संचालन पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी तर आभार निरीक्षक अमोल श्रीमनवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नीलेश तोरे, रामेश्वर दरडे, प्रमोद ढगे, भास्कर दोनाडकर, महेश नाईक यांनी सहकार्य केले.भेदभाव कमी करण्यास मदत- कंकडालवारआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. ते यावर्षी निकाली काढण्यात आले. या योजनेमुळे जाती-जातींतील भेदभाव कमी होण्यास मदत होत आहे. मानवतेची भावना वृद्धींगत होत आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

टॅग्स :marriageलग्नzpजिल्हा परिषद