दीड लाखांचा दारूसाठा व सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST2021-04-13T04:34:42+5:302021-04-13T04:34:42+5:30

चामोशी, नवग्राम, तळोधी, मुरखळा माल येथे अवैध दारूची विक्री केली जात आहे, अशी माहिती पाेलिसांना मिळाली. चामोर्शी पोस्टे परिसरात ...

1.5 lakh liquor stockpile | दीड लाखांचा दारूसाठा व सडवा जप्त

दीड लाखांचा दारूसाठा व सडवा जप्त

चामोशी, नवग्राम, तळोधी, मुरखळा माल येथे अवैध दारूची विक्री केली जात आहे, अशी माहिती पाेलिसांना मिळाली. चामोर्शी पोस्टे परिसरात ५ ठिकाणी दारूबंदीबाबत कारवाई करून १४ हजार लिटर मोहासडवा किंमत १,४०,००० तसेच ३० लिटर मोहादारू किंमत ६,०००, १२५ नग देशी दारू निपा किंमत ८,७५०, ६ नग विदेशी दारू किंमत २४००, १८०० रुपयाची बिअर असा एकूण १,५८,९५० रु. किमतीचा दारूसाठा व सडवा पकडून जप्त करण्यात आला. मिथुन मनोरंजन मंडल (रा. नवग्राम), यादव ऋषी बट्टे (वय ५७, रा. मूरखळा माल), वनिता अनिल भुरसे (रा. तळोधी), गंगाधर अंकडूजी अल्लिवार (रा. चामोर्शी), गोविंदा अतुल बाला (रा. नवग्राम) व राकेश रंगो दास यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, नीशा खोब्रागडे, पल्लवी वाघ, पोहवा दिलीप खोब्रागडे, ज्ञानेश्वर लाकडे, मधुकर होळी, सुमित गायकवाड, सुधाकर उंदिरवाडे, प्रमोद सिडाम, विनोद कुनघाडकर यांनी केली. चामोर्शी पोलिसांचे धाडसत्र सुरू असल्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

===Photopath===

120421\12gad_4_12042021_30.jpg

===Caption===

पाेलिसांनी जप्त केलेला दारूसाठा व ताब्यात घेतलेले आराेपी.

Web Title: 1.5 lakh liquor stockpile