जिल्ह्यातील १३५३ वीज ग्राहक झाले महावितरणच्या थकबाकीतून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 AM2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:27+5:30

गडचिरेाली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून आजपर्यंत भरल्या गेलेल्या ८३ लाख १२ हजार रुपयांच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९ हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९  हजार असे एकूण ५४ लाख ७८ रूपये कृषिग्राहकांच्या गडचिराेली जिल्ह्यातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत.

1353 electricity consumers in the district became free from arrears of MSEDCL | जिल्ह्यातील १३५३ वीज ग्राहक झाले महावितरणच्या थकबाकीतून मुक्त

जिल्ह्यातील १३५३ वीज ग्राहक झाले महावितरणच्या थकबाकीतून मुक्त

Next
ठळक मुद्देगडचिराेलीतील ८३ लाख १२ हजार रुपयांचा केला भरणा

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०  अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून गडचिरोली‍ जिल्ह्यातील २१ हजार ४१९ ग्राहकांपैकी १ हजार ३५३ ग्राहकांनी ८३ लाख १२ हजार रुपयांचा भरणा करुन थकबाकीमुक्तिची वाट धरली.
गडचिरेाली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून आजपर्यंत भरल्या गेलेल्या ८३ लाख १२ हजार रुपयांच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९ हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९  हजार असे एकूण ५४ लाख ७८ रूपये कृषिग्राहकांच्या गडचिराेली जिल्ह्यातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत.
नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील  २९ उपविभागांतर्गत  जनमित्र, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांचेसाेबत कृषी वीज धोरण २०२०, कृषिपंप वीजबिलाची वसुली आणि अकृषक थकबाकी वसुलीबाबत  थेट संवाद साधला. तसेच विविध ग्रामपंचायती अंतर्गत कृषीपंपधारकांचे मेळावे घेत कृषिपंपधारकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले. या  आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोलीतील ४४ कृषी ग्राहकांनी ३ लक्ष ६६ हजार रुपयाचा भरणा करून कृषी वीजबिल थकबाकी मुक्त झाले.  गडचिरोली मंडल अंतर्गत आलापल्ली विभागातील सिरोंचा उपविभागीय कार्यालय अंतर्गत शानगोंडा  गावात पंचायत समिती सदस्य प्रभाकर शानगोंडा, माजी सरपंच ताला वेंकना,पानते मलाय्या व शेतकरी यांच्या समक्ष मेळाव्यात ३५ कृषी ग्राहकांनी ११ लक्ष रुपये भरून कृषी विजबिल थकबाकी मुक्त झाले.  

गडचिराेली श्हरातील एका ग्राहकाचा पुढाकार
गडचिरोली विभागातील ग्राहक चंद्रहास भुसारी यांनी एकाचवेळी १ लाख् ३९ हजार रक्कम भरुन थकबाकीमुक्तिची कास घरली. अनेक ग्राहकांनी या योजनेस प्रतिसाद देत मोठया रक्कमेचे कृषीपंपाचे वीजबिल भरले आहे. अशा सर्व ग्राहकांचा महावितरणद्वारा कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार करण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या  वीज कर्मचारी याचाही सत्कार करण्यात येत आहे.

 

Web Title: 1353 electricity consumers in the district became free from arrears of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज