१२ लाभार्थ्यांना आर्थिक मदत

By Admin | Updated: June 20, 2015 02:14 IST2015-06-20T02:14:53+5:302015-06-20T02:14:53+5:30

राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत माहे मे मध्ये मंजूर करण्यात आलेल्या एकूण २ लाख ४० हजार निधीचे १२ लाभार्थ्यांना वाटप बुधवारी करण्यात आले.

12 Financial Assistance to the beneficiaries | १२ लाभार्थ्यांना आर्थिक मदत

१२ लाभार्थ्यांना आर्थिक मदत

२ लाख ४० हजारांचे वाटप : कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजना
आरमोरी : राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत माहे मे मध्ये मंजूर करण्यात आलेल्या एकूण २ लाख ४० हजार निधीचे १२ लाभार्थ्यांना वाटप बुधवारी करण्यात आले.
यावेळी तहसीलदार एम. टी. वलथरे, नायब तहसीलदार गजानन बन्सोड, आर. एम. मेश्राम, हेमलता मसराम उपस्थित होत्या. यावेळी भाकरोंडी येथील वंदना श्रीराम बोगा, वनखीतील निर्मला राजीराम मंगरे, रवी येथील मनोहर रामा कामथे, कासवीच्या उर्मिला सयाम, बोडधा चकच्या सुशीला भोयर, किटाळी येथील मंगला बावणे, वासाळा येथील सिंधू शिवराम उईके, देलाडा बूज येथील मंजुळा टिकाराम मेश्राम, आरमोरी येथील अनिल बिसन दुधबळे, कुलकुली येथील सरिता देवराव जाळे, पेटतुकूम येथील शीला सुधाकर भांडेकर, सिर्सी येथील कविता गजानन पेंदाम आदी १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे धनादेश तहसीलदार एम. टी. वलथरे, नायब तहसीलदार गजानन बन्सोड यांच्या हस्ते देण्यात आले. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून सदर योजनेंतर्गत लाभ दिला जातो. (प्रतिनिधी)

Web Title: 12 Financial Assistance to the beneficiaries