जिल्ह्यात नवीन ११ पोलीस निरीक्षक रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:37 IST2021-04-01T04:37:29+5:302021-04-01T04:37:29+5:30

पोलीस मुख्यालयात प्रभारी उपअधीक्षक असलेले पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांची नियुक्ती देसाईगंज ठाण्याचे प्रभारी अधिकारी (ठाणेदार) म्हणून करण्यात ...

11 new police inspectors recruited in the district | जिल्ह्यात नवीन ११ पोलीस निरीक्षक रूजू

जिल्ह्यात नवीन ११ पोलीस निरीक्षक रूजू

पोलीस मुख्यालयात प्रभारी उपअधीक्षक असलेले पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांची नियुक्ती देसाईगंज ठाण्याचे प्रभारी अधिकारी (ठाणेदार) म्हणून करण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांची चामोर्शी ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी, नव्याने आलेले पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांची गडचिरोली येथे नक्षल सेलमध्ये, पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांची मुख्यालयात प्रभारी पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक कपिल कचरू गेडाम यांची गडचिरोली येथील नियंत्रण कक्षात, पोलीस निरीक्षक विश्वास सुभाष जाधव यांची जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून, पोलीस निरीक्षक गौरव कृष्णराव गावंडे यांची सायबर ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी, पोलीस निरीक्षक श्याम गोविंदराव गव्हाणे यांची कोर्ट पैरवी शाखेत, पोलीस निरीक्षक संदीप विठ्ठल पाटील यांची नियंत्रण कक्षात, किरण हरिभाऊ रासकर यांची भामरागड ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी, विजयानंद पद्माकर पाटील यांची एटापल्ली ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी, महेश नामदेव मेश्राम यांची अपर पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे, तसेच पोलीस निरीक्षक कुमारसिंग रामचंद्र राठोड यांची आष्टी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टी तसेच देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी वादात सापडल्याच्या कारणावरून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 11 new police inspectors recruited in the district