शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन- जियानी इन्फन्टिनो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 4:20 AM

कोलकाता : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे कौतुक करीत जागतिक फुटबॉल महासंघाचे प्रमुख जियानी इन्फन्टिनो यांनी २० वर्षांखालील विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल दावेदारी सादर करण्यासाठी भरवसा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.येथे झालेल्या फिफा कौन्सिल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना इन्फन्टिनो म्हणाले, ‘भारतात फुटबॉल लोकप्रिय होत आहे. विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनामुळे निर्माण ...

कोलकाता : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे कौतुक करीत जागतिक फुटबॉल महासंघाचे प्रमुख जियानी इन्फन्टिनो यांनी २० वर्षांखालील विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल दावेदारी सादर करण्यासाठी भरवसा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.येथे झालेल्या फिफा कौन्सिल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना इन्फन्टिनो म्हणाले, ‘भारतात फुटबॉल लोकप्रिय होत आहे. विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनामुळे निर्माण झालेले वातावरण टिकविण्यासाठी फिफा भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल.’ भारतात विश्वचषकाच्या आयोजनास उदंड प्रतिसाद लाभला. भारतीय प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल फिफा आभारी आहे. विश्वचषक सामने पहिल्यानंतर आपण योग्य देशाला ही स्पर्धा दिल्याचा आनंद झाला.भारताने यापुढे अंडर-२० आयोजनाची दावेदारी सादर केल्यास ती विचारात घेतली जाईल का, असा सवाल करताच इन्फेन्टिनो म्हणाले, ‘याची खात्री मी देऊ शकणार नाही. यंदा दोन विश्वचषक स्पर्धा आशियात झाले. द. कोरियाने २० वर्षांखालील आणि भारताने १७ वर्षांखालील विश्वचषक यशस्वी केला. २०१९ चा २० वर्षांखालील विश्वचषक आयोजित करण्यासाठी अनेक राष्टÑांनी दावेदारी सादर केली आहे. फिफा प्रशासन सर्व बाबींचा विचार करून फिफा कौन्सिलकडे अहवाल सादर करेल. त्यानंतरच आयोजन कुठे होईल, याचा निर्णय घेतला जाईल.’अ. भा. फुटबॉल महासंघाने दावेदारी सादर केली असली तरी यापुढे मोठ्या स्पर्धेचा विचार करायला हवा. भारतात वाढलेली फुटबॉलची लोकप्रियता आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हावेत. भारतीय संघाचे सामने देखील मी पाहिले आहेत. भारतीय खेळाडू आणि विदेशी खेळाडू यांच्यातील खेळात मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी यजमान संघाने आणखी मजल गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असा सल्ला देखील फिफा प्रमुखांनी दिला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Footballफुटबॉल