शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉल : घाना संघावर २-१ गोलने मात करत माली उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:19 IST

हादजी ड्रेम आणि जिमुसा ट्राओरे याच्या गोलच्या बळावर माली संघाने आज येथे दोन आफ्रिकन संघांदरम्यान झालेल्या लढतीत घाना संघावर २-१ अशी मात करून फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

गुवाहाटी : हादजी ड्रेम आणि जिमुसा ट्राओरे याच्या गोलच्या बळावर माली संघाने आज येथे दोन आफ्रिकन संघांदरम्यान झालेल्या लढतीत घाना संघावर २-१ अशी मात करून फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरी गाठणारा माली हा पहिला संघ ठरला.ड्रेमने १५ व्या मिनिटाला माली संघाला आघाडी मिळवून दिली होती तर ट्राओरेने ६१ व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी २-० अशी दुप्पट केली. घाना संघाकडून कुदुस मोहम्मद याने ७० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. हा सामना इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक स्टेडियममध्ये पावसात खेळवला गेला.उद्या स्पेन आणि इराण यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघाविरुद्ध माली संघ बुधवारी नवी मुंबईत सेमीफायनलमध्ये दोन हात करील. माली संघाने यावर्षी आफ्रिका नेशन कप अंडर १७ फायनलमध्येदेखील घानाला पराभूत केले होते आणि येथेदेखील या पश्चिम आफ्रिकी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखण्यात ये ते यशस्वी ठरले.>ड्रेमच्या गोलने घाना आले दबावातपावसामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी संघासाठी परिस्थिती प्रतिकूल होती. माली संघाने पूर्वार्धात वर्चस्व ठेवले आणि त्यांनी १५ व्या मिनिटाला पहिला गोल करून घाना संघावर दबाव टाकला. ड्रेम याने एकट्याने घानाच्या गोलपोस्टपर्यंत धडक मारत आणि गोलरक्षक डोनाल्ड इब्राहिम याला सहजपणे चकवताना गोल केला. हा त्याचा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.घाना संघाने बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु यादरम्यान त्यांना नशिबाची साथ मिळालीनाही. मध्यंतराच्या काही क्षणाआधी इब्राहिम सुले याने गोल केला होता; परंतु त्याचा सहकारी कुदुस मोहंमदच्या फाउलमुळे हा गोल अमान्य करण्यात आला.माली संघाने एकतासाचा खेळ संपल्यानंतर तात्काळ ट्राओरे याच्या गोलने आपली आघाडी दुप्पट केली. त्याने घानाच्या विखुरलेल्या बचावफळीचा फायदा घेत आणि इब्राहिमला चकवत गोल केला.घानाला ७० व्या मिनिटांत स्थानापन्न सादिक इब्राहिमला मालीच्या बॉक्समध्ये पाडल्या गेल्यामुळे पेनल्टी मिळाली. त्याचे कुदुस मोहंमदने गोलमध्ये रुपांतर केले. तथापि, त्यानंतर बरोबरी साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर मालीच्या खेळाडूंनी पाणी फेरले आणि दुसºयांदा अंडर १७ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. माली संघाचा कर्णधार मोहम्मद कमरा याला आज दुसरे पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे तो उपांत्य फेरीत खेळू शकणार नाही.

टॅग्स :Footballफुटबॉल