आंबा वरून चांगला दिसतो, पण घरी कापल्यावर आतून सडलेला निघतो; आतून सडलाय की नाही कसं ओळखाल? पाहा ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:47 IST2026-05-10T14:46:11+5:302026-05-10T14:47:09+5:30

Mango Buying Trick : सध्या सोशल मीडियावर याच समस्येवर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात इंस्टाग्राम यूजर तेजश्री ठाकूर आंबे निवडण्याची एक भन्नाट ट्रिक सांगताना दिसते.

Mango Buying Trick : Trick to check mango is sweet ripe or rotten inside | आंबा वरून चांगला दिसतो, पण घरी कापल्यावर आतून सडलेला निघतो; आतून सडलाय की नाही कसं ओळखाल? पाहा ट्रिक

आंबा वरून चांगला दिसतो, पण घरी कापल्यावर आतून सडलेला निघतो; आतून सडलाय की नाही कसं ओळखाल? पाहा ट्रिक

Mango Buying Trick : उन्हाळा आला की, आंबे खाण्याचा आनंद सगळेच लुटतात. उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो. पण आंबे खरेदी करताना अनेकांची एकच तक्रार असते बाहेरून छान दिसणारा आंबा कापल्यावर आतून काळा किंवा सडका निघतो. काही आंबे पिकलेले असतात पण हिरवेच दिसतात, तर काही पिवळे झाले तरी आतून कच्चे असतात. अशा वेळी गोड आणि चांगला आंबा कसा ओळखायचा, हा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर याच समस्येवर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात इंस्टाग्राम यूजर तेजश्री ठाकूर आंबे निवडण्याची एक भन्नाट ट्रिक सांगताना दिसते.

चांगला आंबा ओळखायची सोपी ट्रिक

व्हिडिओमध्ये तेजश्री एका आंब्याच्या दुकानात बसलेली दिसते. ती सांगते की अनेकदा आंबे वरून अगदी परफेक्ट दिसतात, पण कापल्यावर आतून खराब निघतात. त्यानंतर ती दुकानदाराला विचारते की चांगला आंबा कसा ओळखायचा?

दुकानदार काही आंबे हातात घेऊन समजावतो की खराब आंबेही वरून चांगले दिसू शकतात. तो आंबा हलकासा दाबून दाखवतो. त्याच्या मते, जर आंबा दाबल्यानंतर लगेच पूर्ववत झाला, तर तो आतून खराब असण्याची शक्यता असते. तसेच खूपच मऊ किंवा जास्त दाबला जाणारा आंबा घेणे टाळावे.

छोटासा डागही देऊ शकतो संकेत

व्हिडिओमध्ये एक आंबा अगदी चांगला दिसत होता. त्यावर फक्त छोटासा डाग होता. तेजश्रीला तो परफेक्ट वाटला, पण कापल्यावर तो आतून खराब निघाला. दुकानदाराने सांगितले की, कधी कधी अगदी छोटासा डागही आतल्या खराबीचा इशारा असू शकतो.

फक्त रंग पाहून निर्णय घेऊ नका

फूड एक्सपर्ट्सच्या मते, आंबा खरेदी करताना फक्त रंग पाहून निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते. चांगला आंबा ओळखण्यासाठी आंब्याचा सुगंध घ्या, हातात घेतल्यावर वजन जाणवा, सालीची बनावट तपासा जर आंब्यातून गोड सुगंध येत असेल आणि तो हातात जड वाटत असेल, तर तो चांगला आणि रसाळ असण्याची शक्यता जास्त असते.


कोणते आंबे टाळावेत?

- खूप जास्त मऊ झालेले आंबे

- सुरकुतलेली साल असलेले आंबे

- काळे डाग किंवा विचित्र वास असलेले आंबे

असे आंबे खराब निघण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पुढच्या वेळी बाजारात आंबे घ्यायला गेल्यावर या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर गोड, रसाळ आणि चांगले आंबे निवडणे खूप सोपे होईल.    

Web Title : सड़े हुए आम की पहचान कैसे करें: सरल उपाय और सुझाव

Web Summary : निराशाजनक आमों से बचें! खरीदने से पहले आंतरिक खराबी का पता लगाना सीखें। दृढ़ता, सुगंध और त्वचा की बनावट जांचें। छोटे धब्बे छिपे हुए सड़ांध का संकेत दे सकते हैं। सर्वोत्तम, रसीले अनुभव के लिए सुगंधित, भारी आमों का चयन करें।

Web Title : How to Identify a Rotten Mango: Simple Tricks and Tips

Web Summary : Avoid disappointing mangoes! Learn how to spot internal spoilage before buying. Check for firmness, scent, and skin texture. Small blemishes can indicate hidden rot. Choose fragrant, heavy mangoes for the best, juicy experience.