शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पोषक तत्वांचा खजिना आहे सीताफळ; डोळे, हृदय यांचं आरोग्य राखण्यास करतं मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:36 AM

सिताफळ पोषक तत्वांचा खजिना आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. खासकरून जर हे फळं गरोदरपणात आई आणि बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

सिताफळ पोषक तत्वांचा खजिना आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. खासकरून जर हे फळं गरोदरपणात आई आणि बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दरम्यान सिताफळ अनेक गंभीर आजारांमध्येही फायदेशीर ठरतं. हाय आणि लो ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयरोग यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी सिताफळ मदत करतं. त्याचबरोबर सिताफळ रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठीही मदत करतं. 

व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक असल्यामुळे अ‍ॅलर्जी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासूनही बचाव करण्याचं काम करतो. तसेच हे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचंही काम करतं. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतं. सिताफळमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. जे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. एवढचं नाहीतर अपचन गॅस यांसारख्या समस्यांमध्ये  सिताफळ गुणकारी ठरतं. सिताफळ तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. तुम्ही शक्य असल्यास सिताफळ स्मूदी किंवा सिताफळ शेक पिऊ शकता. 

सिताफळाच्या इतर आरोग्यादायी फायद्यांबाबत जाणून घेऊया... 

गरोदरपणात फायदेशीर... 

गरोदरपणात सिताफळ खाणं आईसाठी आणि बाळासाठी फायदेशीर मानलं जातं. सिताफळाच्या सेवनाने पोटात वाढणाऱ्या अर्भकाचा विकास होतो. तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो. तसेच नॉर्मल डिलिवरीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. 

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर... 

सितापळामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं आणि हे हार्ट अचॅकचा धोका रोखण्यासाठी मदत करतात. दररोज याचं सेवन केल्याने मांसपेशी मजबुत होतात. तसेच शरीरात होणाऱ्या वेदनांपासून सुटका होते. व्हिटॅमिन बी6 होमोसिस्टीन रोखतं त्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो. 

रोगप्रतिकार शक्ती होते मजबुत..

दररोज तीन सिताफळ खाल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. तसेच आजारातू झटपट बरं होण्यासाठीही सिताफळ मदत करतं. शरीराला रोगोपासून लढण्यासाठी शक्ती देण्याचं काम सिताफळ करतं. 

सुस्ती आणि थकवा दूर करतं 

सिताफळ खाल्याने अस्वस्थता, थकवा दूर होतो. तसेच स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनाही दूर होऊन आराम मिळतो. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य