परंतु, रात्री तापमानात होणारी वाढ दिवसापेक्षा अधिक का असते, याचे कारण शोधण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत होते. अखरे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
नॉर्वेमधील नॅनसेन इन्वाइरन्मेन्टल अँड रिमोट सेन्सिग सेंटर येथील प्रमुख संशोधक रिचर्ड डेव्ही यांच्या टीमने केलेल्या संशोधनानुसार, रात्री वाढणारी गरमी आणि हवामानप्रणालीचा थेट संबंध असतो. रात्रीचे तापमानावर वातावरणीय बलाचा परिणाम होत असल्यामुळे रात्री गरमी झटपट वाढते.
गरमीची वाढ ही पृष्ठभागापासून थोड्याशा वर असणाऱ्या हवेच्य थरावर अवलंबुन असते. यालाच ‘सीमा थर’देखील म्हणतात. वातावरणाशी एकदम वेगळा असा हा हवेचा थर असतो. दिवसा काही किलोमीटर जाडीचा हा थर रात्री केवळ काही शेकडो मीटरचा होऊन जातो. त्यामुळे रात्रीचे तापमान लवकर वाढते.
कृत्रिमरीत्या वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायआॅक्साईडमुळे अंतराळात जाणाºया रेडिएशन्सचे प्रमाण घटते आणि त्यामुळेदेखील तापमानात वाढ होते.