वडिलांच्या आॅफिसात मॅक्स, तिची आई चॅन आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून मार्कचा वाढदिवस साजरा केला.
या क्षणाचा एक खूप छान फोटो मार्कने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. त्यामध्ये तो केकवरील मेणबत्ती फुकून विझवतोय तर मॅक्स कंपनीच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांच्या मांडीवर बसलेली आहे. बाजूला तिची आई चॅनदेखील आहे.
फोटो कॅप्शनमध्ये मार्क लिहितो की, माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मॅक्सने फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. सर्वांच्या शुभेच्छांसाठी मी सर्वांचेच आभार मानतो. लोकांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य असेच जोमाने सुरू ठेवणार.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात मार्कची पत्नी चॅनने मुलीला जन्म दिला होता. तिची नाव ‘मॅक्झिमा’ असून सर्व जण तिला प्रेमाने मॅक्स म्हणूनच ओळखतात. तिच्या जन्मानंतर झुकेरबर्गने फेसबुकचे 99 टक्के शेअर समाज कार्याला दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.