मोगलीच्या भूमिकेसाठी दोन हजार आॅडीशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:54 IST2016-04-17T10:24:31+5:302016-04-17T15:54:31+5:30

‘द जंगल बुक’ या चित्रपटासाठी संगळ्याकडूनच कौतुकाच वर्षाव होत असलेल्या निर्माता जॉन फेवरोचे म्हणणे आहे की, मोगलीच्या भूमिकेसाठी तब्बल दोन हजार आॅडीशनमधून भारतीय वंशाचा अमेरिका निवासी बाल कलाकार नील सेठी याची निवड करण्यात आली. 

Two thousand editions of Mowgli's role | मोगलीच्या भूमिकेसाठी दोन हजार आॅडीशन

मोगलीच्या भूमिकेसाठी दोन हजार आॅडीशन

जंगल बुक’ या चित्रपटासाठी संगळ्याकडूनच कौतुकाच वर्षाव होत असलेल्या निर्माता जॉन फेवरोचे म्हणणे आहे की, मोगलीच्या भूमिकेसाठी तब्बल दोन हजार आॅडीशनमधून भारतीय वंशाचा अमेरिका निवासी बाल कलाकार नील सेठी याची निवड करण्यात आली. फेवरोने सांगितले की, मोगलीचे पात्र रंगविण्यासाठी आम्ही अनेक बालकलाकारांचे आॅडीशन्स घेतले. ज्यात नील आम्हाला या पात्रासाठी योग्य वाटला. नील मॅनहॅट्टनचा असून, त्याला कुठल्याही प्रकारचा अभिनयाचा अनुभव नव्हता. शिवाय त्याने कधीही आॅडीशन दिले नव्हते. परंतु त्याच्यात एक अद्भुत करिष्मा होता. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा त्यात मला कुठेही भिती बघावयास मिळाली नाही. तो आत्मविश्वासाने माझ्याशी बोलत होता. मी जेव्हा जुन्या मोगलीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या केल्या, तेव्हा नील त्यामधीलच मला वाटत होता, असेही त्याने सांगितले. 

Web Title: Two thousand editions of Mowgli's role