शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:18 IST

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते....

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते. यावेळी लागलेल्या सवयी आपल्या जीवनाला कायमस्वरूपी आकार देणार्‍या असतात. म्हणूनच आनंदी आणि परिपूर्ण आयुष्यासाठी विशीतील प्रत्येक तरुणामध्ये पुढील गुण असायलाच पाहिजे. १. प्रामाणिकपणाआपल्या व्यक्तित्वाचा सर्वात मोठा अलंकार म्हणजे प्रामाणिकपणा. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमची विश्‍वासहर्ता वाढते. एखाद्या ठिकाणी तुम्ही उशिरा पोहचला तर खोटे कारण सांगण्याऐवजी खरं खरं सांगून द्या की तुमचे आजचे नियोजन चुकले. यामुळे खोटं लपविण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.२. टीका सहन करणेस्पर्धेत टिकायचे असेल तर टीका सहन करावी लागणार हे अटळ सत्य आहे. दुसर्‍यांनी चूक दाखवून दिली तर चिडू नका. लोकांचे आपल्या बद्दलचे मत जाणून त्यावर आवश्यक ते बदल करणे खर्‍या अर्थाने प्रगतीचा राजमार्ग आहे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे जे म्हणतात ते उगीच नाही.३. रागावर नियंत्रणक्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ नाहक खर्च होतो. त्यामुळे रागावू नका. या ऊज्रेला जर योग्य दिशा दिली तर किती तरी अशक्यप्राय गोष्टीं तुमच्या हातून घडण्याची शक्ती मिळते.४. नकार पचवायला शिकाया वयात सर्वांची भावना 'आज मैं उपर, आसमाँ निचे' अशीच असते. अश स्थितीत पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली तर हिरमोड होतो. परंतु सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळू नाही शकत. त्यामुळे नकार पचवून नव्या दमाने पुन्हा प्रयत्न करणारेच आयुष्यात यशस्वी होतात.५. दिलेला शब्द पाळाशब्दाला जागतो तोच खरा माणूस. 'प्राण जाए पर वचन न जाए' अशी आपली संस्कृती. दुसर्‍यांना दिलेला शब्द, वचन पाळलेच पाहिजे. वचन मोडण्यासारखा गैरप्रकार दुसरा नाही. त्यामुळे जर शक्य नसेल आधीच तसे सांगा. कारण दिलेला शब्द परत नाही घेता येत.