महिला पत्रकाराने गेलला केले माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:30 IST2016-01-16T01:06:14+5:302016-02-11T23:30:00+5:30

ऑस्ट्रेलियातील महिला पत्रकार मेल मॅकलॉघलिन हिने आपण क्रिकेटपटू ख...

Sorry for the woman journalist Gayle | महिला पत्रकाराने गेलला केले माफ

महिला पत्रकाराने गेलला केले माफ


/>ऑस्ट्रेलियातील महिला पत्रकार मेल मॅकलॉघलिन हिने आपण क्रिकेटपटू ख्रिस गेल याला माफ केले असल्याचे म्हटले आहे. गेलने आपल्या वक्तव्याबद्दल मंगळवारी दुपारी माफी मागितली होती. ती म्हणाली, या प्रकरणामुळे मला काहीसे अवघडल्यासारखे वाटत होते. यापूर्वी मी कधीही मी अशा एखाद्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी नव्हते. आता मात्र मी हे प्रकरण विसरू इच्छिते. सोमवारी एका मुलाखतीदरम्यान गेलने केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले होते. मलाही तुझी भेट घेऊन तुझी मुलाखत घ्यायची होती. यासाठीच मी येथे आलो आहे. मला तुझे डोळे पाहायची इच्छा होती. सामन्यानंतर आपण सोबत ड्रिंक घेऊ, असे गेल म्हणाला होता.

Web Title: Sorry for the woman journalist Gayle