शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुंजाळ कन्येचे हायप्रोफाईल लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:46 IST

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. राजधानी दिल्लीत मंगळवारी ज्येष्ठ उद्योगपती 'हिरोमोटो कॉर्प'चे अध्यक्ष पवन मुंजाळ यांची कन्या वसुधा हिचा विवाह निमंत्रित हायप्रोफाईल वर्‍हाडींच्या उपस्थितीत शाही थाटात पार पडला. 

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. राजधानी दिल्लीत मंगळवारी ज्येष्ठ उद्योगपती 'हिरोमोटो कॉर्प'चे अध्यक्ष पवन मुंजाळ यांची कन्या वसुधा हिचा विवाह निमंत्रित हायप्रोफाईल वर्‍हाडींच्या उपस्थितीत शाही थाटात पार पडला. दिल्लीस्थित दिनोदिया कॅपिटल अँडव्हायझर्स फर्मचे कार्यकारी संचालक पंकज दिनोदिया यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. अर्थात, मुंजाळ यांनी हा सोहळा साधेपणाने आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडल्याचे सांगितले. तरीही, या सोहळ्याला उद्योगजगतातील व राजकारणातील बडी हस्ती तसेच नातेवाईक व जवळची मित्रमंडळी अशा दीड हजार मान्यवर प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती होती. दिल्लीनजीकच्या मधुबन फार्म हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी, १३ ऑक्टोबरला दिल्लीतील हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये मेंदीची रस्म (प्रथा) उत्साहात पार पडली, तर १२ ऑक्टोबरला फार्म हाऊसमध्ये संगीताचा कार्यक्रम झाला. ऑगस्ट महिन्यात दिल्लीतच एका शानदार समारंभात वसुधा व पंकज यांचा वाङ्निश्‍चय (साखरपुडा) झाला. पारंपरिक पंजाबी रीतिरिवाजानुसार तो झाला होता. प्रसिद्ध पॉपगायक मिकाने त्या वेळी पाहुण्या मंडळींचे मनोरंजन केले होते.नववधू वसुधा ही चाकोला या चॉकलेट ब्युटिक शॉपची मालकीण आहे. देशभरात या कंपनीची अनेक शॉप आहेत. साहजिकच वेलवेटच्या आकर्षक चॉकलेटच्या बॉक्समधून दिलेल्या निमंत्रणपत्रिकेपासून त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली होती. तर, पंकज हॉवर्ड स्कूल ऑफ बिझनेसचा एमबीए आहे. आर्थिक सल्ला व सेवा देणार्‍या या फर्मचा देशात चांगलाच नावलौकिक आहे.या खास शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उमर अब्दुल्ला, अरुण जेटली, सुनील मित्तल, बडी उद्योजक मंडळी, राजकीय नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले होते.