​पुरुष- महिला कधीच होऊ शकत नाही मित्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 21:15 IST2016-09-14T15:45:29+5:302016-09-14T21:15:29+5:30

पुरुष व महिला हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नाही संशोधनातून ही बाब समोर आली आहे

Men - women can never be friends! | ​पुरुष- महिला कधीच होऊ शकत नाही मित्र !

​पुरुष- महिला कधीच होऊ शकत नाही मित्र !


/>
 पुरुष व महिला हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नाही. हे वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटले असेल. परंतु, एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात यावर संशोधन करण्यात आले. यामधून अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. या संशोधनासाठी ८८ मित्र व त्यांच्या मैत्रीणींना बोलविण्यात आले होते. यामध्ये प्रत्येकांना  वेगळे घेऊन प्रश्न विचारण्यात आले. 
 महिला अधिक प्रमाणात पुरुष मित्रासोबत मैत्रीची भावना ठेवतात. पुरुषांमध्ये ती एका चांगल्या मित्राला शोधत असते. मित्रासोबत पे्रमापेक्षा मैत्रीला अधिक प्रमाणात महिलांकडून प्राधान्य दिले जाते. 
तर पुरुषांचे विचार हे त्यांच्यापेक्षा अगदीच वेगळे निघाले. यामध्ये अधिक जणांनी आपल्या महिला मैत्रीणीविषयी प्रेमाची भावना असल्याची सांगितले. महिला मैत्रीणीमध्ये पुरुष प्रेयसीचा शोध घेत असल्याचे समोर आले.  पुरुषांमध्ये मित्रात्वाच्या भावनेपेक्षा प्रेमाची भावना अधिक असल्याचे समोर आले. यावर महिला व पुरुषांचे विचार हे वेगवेगळे आहेत. त्यामुळेच मुलगा व मुलगी हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नसल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. 

Web Title: Men - women can never be friends!