एखाद्या अचाट कल्पनेला व्यावसायिकरूप देऊन स्वत:चा बिझनेस सुरू करण्याचा हा ट्रेंड आहे. अशा स्टार्टअपची एक खासियत म्हणजे त्यांचे अपारंपरिक आॅफिसेस.
खुर्च्या, टेबल, क्युबिकल अशा ट्रेडिशनल आॅफिस ऐवजी ‘फन झोन’ प्रकारातील आॅफिस बनवण्याकडे कल वाढला आहे. आता बेंगळूरूतील ‘रेझरपे’च्या आॅफिसचे उदाहरण पाहा ना.
11 हजार चौ.फुट जागेवर असणाऱ्या या एक मजली आॅफिसमध्ये स्वयंपाकघर (छोटी पॅन्ट्री), जिम, शॉवर, एक्सबॉक्स व्हिडिओ गेम्स व चेससह रिक्रीएशन रुम अशा एक ना अनेक भन्नाट गोष्टी आहेत.
‘रेझरपे’चा सहसंस्थापक 25 वर्षीय हर्शिल माथूर सांगतो की, आॅफिस डिझाईन करताना लोकांना काम करायला आवडेल असे ‘फन’ प्लेस त्याबरोबरच व्यावसायिक गांभिर्यता या दोन गोष्टींकडे आम्ही लक्ष दिले. अवाजवी ‘प्लेफूलनेस’ न करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
आॅफिसमध्ये दोन ‘सायलेंट रूम्स’ आहेत. जिथे लोक एकट्यात काम करू शकतात. तसेच कामाच्या तणावातून थोडी मोक ळिक मिळावी म्हणून झोप काढायची असल्यास तीदेखील सुविधा येथे आहे.
आता असे आॅफिस असले तर किती मज्जा येईल नाही?