या पासवर्डच्या मदतीने हॅकर्सनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला बांगलादेश बँकेच्या खात्यातून फिलिपाईन्स आणि श्रीलंकन बँकांच्या काही खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विनंती केली. फेडरल रिझर्व्हने पहिल्या चार विनंती स्वीकारत 10 कोटी डॉलर्स ट्रान्सफर केले होते. मात्र ज्या एनजीओच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे होते, हॅकर्सनी त्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले.
यानंतर फेडरल रिझर्व्हने ट्रान्सफर करण्याची प्रकिया थांबवत बांगलादेश सेंट्रल बँकेकडून स्पष्टीकरण मागितले. यातच चोरीचा उलगडा झाला. हॅकर्सनी एनजीओच्या नावात फाऊंडेशनऐवजी चुकीने फंडडेशन लिहिले होते.