इंटनेटच्या युगात आता मनोरंजनाची माध्यमं बदलत आहेत. टीव्ही, नाटक, सिनेमे यांपासून वेगळा असा डिजिटल प्लॅटफॉर्म आता नव्या कलावंताना खुणावत आहे.
त्यासाठी यूट्यूब तर हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक कॉमेडियन स्वत:च्या यूट्यूब चॅनेलद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत आपली कला पोहचवित आहेत.
असे यूट्यूब कॉमेडियन्स मिळून आता एक नवीन प्रयोग करू पाहत आहेत. देशातील टॉप कॉमिक ग्रुप्स ‘ओन्ली मच लाऊडर’, ‘कल्चर मशीन’ आणि ‘अर्रे’ मिळून ‘#लाफ्टरगेम्स’ नावाने नवीन वेबसिरिज सुरू करणार आहेत.
यामध्ये ‘एसएनजी कॉमेडी’, ‘ईस्ट इंडिया कंपनी’, ‘अनुभव पाल’, ‘एन्ना दा रास्कला’, ‘रँडम चिकबम’, ‘केनेथ सेबेस्टियन’, ‘देम बॉक्सर शॉटर््स’ आणि ‘पुट चटनी’ यांसारखे एकाहून एक सरस कॉमेडियन्स नेटिझन्सला हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘ओन्ली मच लाऊडर’चे सीओओ अजय नायर म्हणतात, भारतामध्ये अस्सल डिजिट कॉन्टेटला मागणी फार वाढली आहे. त्यामुळे देशातील एवढ्या चांगल्या कॉमेडियन्सना एकत्र करून प्रेक्षकांना मनोरंजानाची अनोखी मेजवानी देण्याचे काम आम्ही ‘#लाफ्टरगेम्स’द्वारे करत आहोत.
हसण्यासाठी तयार व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:45 IST