शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे अवतरल्या साडीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:44 IST

बंगळुरूमधील श्री सोमेश्वर मंदिरात थेरसा यांनी सोनरी व हिरव्या रंगाची साडी घालून दर्शन घेतले.

एकिकडे ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड आणि दुसरीकडे ५०० आणि १०००च्या नोटा रद्द असे दोन मुद्दे ट्रेंडिंग होत असताना साहेबांच्या देशाच्या पंतप्रधान थेरिसा मे सध्या सोशल मीडियावार प्रचंड गाजत आहेत.पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या थेरसा यांनी येथील पारंपरिक वेशभूषा असलेली साडी परिधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बंगळुरूमधील श्री सोमेश्वर मंदिरात थेरसा यांनी सोनरी व हिरव्या रंगाची साडी घालून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत दोन पुजारीदेखील होते.तीन दिवसीय दौऱ्यामध्ये थेरेसा यांनी बंगळुरूमध्ये असताना व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हलासुरू भागातील या प्रसिद्ध मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मनोभावे भगवान शंकराची पूजा केली. मंदिर प्रशासनाकडून त्यांना या भेटीची आठवण म्हणून भेटदेखील देण्यात आली.                                                                                             युरोपियन महासंघातून (ईयू) बाहेर पडण्याच्या बाजूने कौल (ब्रेक्झिट) मिळाल्यावर पूर्व पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर थेरेसा मे यांची इंग्लंडच्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्गारेट थॅचरनंतर ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होणाऱ्या त्या दुसºया महिला आहेत.बंगळुरूमध्ये आल्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. निवडक व्यवसायिकांशी मग त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एक शासकीय प्राथमिक शाळा आणि विमानकंपनी ‘एअरबस’ला सेवा पुरवणाऱ्या हाट-टेक कंपनीला भेट दिली.                                                                                             बरं साडी परिधान करण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. थेरेसा मे यांनी अनेक समारंभांमध्ये साडी आणि इतर भारतीय पोषाख घालून वेळोवेळी हजेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी आॅफिसला जाताना साडी घातल्याची बातमी प्रचंड गाजली होती. मात्र, ती अफवा ठरली.भारत आणि भारतीय लोकांशी निगडित कार्यक्रमांना थेरेसा आवर्जुन भारतीय ड्रेसला प्राधान्य देतात. ‘एशियन रिच लिस्ट लाँच’ या कार्यक्रमाला त्यांनी सलवार कमीज घातली होती. त्यांच्या या भारतप्रेमामुळे भविष्यात ब्रिटनसोबत आपले संबंध आणखी मजबुत होतील, अशी आशा आहे.                                                                                                   ते बाकी असो, थेरेसा मे साडीमध्ये अत्यंत शालीन आणि सुंदर दिसतात हे खरं! त्यांच्या या चॉईसमुळे जागतिक पातळीवर पारंपरिक भारतीय वेशभूषा ठळक उठून दिसेल. हो ना!