शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

बिनडोक सिनेमे पाहून व्हा स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 19:19 IST

‘बी’ आणि ‘सी’ ग्रेड चित्रपटांचे अजबच वैशिष्ट्य समोर आले आहे. बिनडोक चित्रपट आग्रहाने पाहणारे लोक ‘स्मार्ट’ असतात.

मसालापट आणि मनोरंजनाच्या नावाखाली आपल्याकडे ‘बिनडोक’ सिनेमे बनवले आणि दाखवले जातात. ‘मार्इंडलेस’, ‘तर्कहीन’ अशा विशेषणांनी उल्लेख केल्या जाणाऱ्या या चित्रपटांना कितीही दूषणं दिली तरी काही फरक पडत नाही. पण अशाच ‘बी’ आणि ‘सी’ ग्रेड चित्रपटांचे अजबच वैशिष्ट्य समोर आले आहे.बिनडोक म्हणवले जाणारे असे सुमार चित्रपट आग्रहाने पाहणारे लोक ‘स्मार्ट’ असतात. कमी खर्चात आणि सुमार दर्जाच्या कथेवर आधारित अशा कमी गुणवत्तेच्या सिनेमांचा चाहता हा सामन्यपणे अधिक हुशार असतो.जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर एम्पायरिकल एस्थेटिक्स’चे सिनेअभ्यासक केव्यान सार्कोष केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, तथाकथितरीत्या सुमार दर्जाचे मानले जाणारे सिनेमे आवडणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मकता अधिक असते.सार्कोष यांनी फेसबुक व अशा सुमार दर्जाच्या चित्रपटांविषयीच्या फोरम्सवर सक्रीय असणाऱ्या ३७२ जणांचा आॅनलाईन अभ्यास केला. त्यामध्ये अशा प्रकारचे सिनेमे आवडणारे ८४ टक्के लोक हे पदवीधर होते. याचा अर्थ की ते उच्च शिक्षित होते. आवडीने असे सिनेमे पाहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची विनोदीशैली आणि निव्वळ मनोरंजन. ‘थर्ड ग्रेड’ चित्रपटांमध्ये बिग बजेट व्यावसायिक सिनेमांप्रमाणे तंत्र आणि अभिरुची नसते.याची कारणीमीमांसा करताना ते सांगतात की, असे चाहते वैविध्यपूर्ण कलाप्रकारांचा आस्वाद घेण्यास उत्सुक असतता. पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाण्याकडे त्यांचा कल असतो. मेनस्ट्रीम सिनेमांपासून काही तरी वेगळं, काही तरी हटके पाहण्याचा आणि त्याचा कलास्वाद घेण्याची वृत्ती जोपासणारे लोक हे पर्यायाने अधिक स्मार्ट असतात.म्हणजे येथून पुढे तुमच्या मित्राने ‘टुकार’ सिनेमा  पाहण्याचा आग्रह केला तर त्याला ‘थर्ड क्लास’ म्हणून हिणवू नका. काय सांगता, तो तुमच्यापेक्षा अधिक हुशार असेल.