​आॅस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 19:54 IST2016-04-15T14:23:29+5:302016-04-15T19:54:47+5:30

आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आज शुक्रवारी विवाहबंधनात अडकला.

Australian bowler Mitchell Starc married | ​आॅस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क विवाहबंधनात

​आॅस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क विवाहबंधनात

स्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आज शुक्रवारी विवाहबंधनात अडकला. एलिसा हिली हिच्यासोबत मिचेलने लग्नगाठ बांधली. एलिसा ही आॅस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघातील यष्ठीरक्षक आहे.  मिचेल व एलिसाच्या विवाहसोहळ्याला आॅस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडूंची उपस्थिती होती. दुखापतीमुळे यंदा मिचेल टी-२० विश्वचषक खेळू शकला नव्हता. यंदाच्या आयपीएलमध्येही तो सहभागी झालेला नाही. एलिसी हिली हिने मात्र यंदाच्या महिलांच्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाºया आॅस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले होते. एलिसाचे वडील ग्रेग हे आॅस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. एलिसा व मिचेल नऊ वर्षांचे असताना एका क्रिकेटस्पर्धेदरम्यान एकमेकांना भेटले होते. दोघांनीही ११ वर्षांखालील संघात यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाभली होती. नंतर सहा वर्षे हे दोघे एकत्र खेळले. यादरम्यान दोघांमध्येही घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

Web Title: Australian bowler Mitchell Starc married