​४० नावे असलेला मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 18:49 IST2016-09-13T13:19:02+5:302016-09-13T18:49:02+5:30

फिलिपिन्सच्या एका तरुणाला तब्बल ४० नावे आहेत.

40 son named | ​४० नावे असलेला मुलगा

​४० नावे असलेला मुलगा


/>एका व्यक्तीला एक किंवा दोन नावे असतात. दोन्हीही नावे लिहायची झाली तर ऊर्फ लावून ते आपल्याकडे लिहिले जातात; परंतु फिलिपिन्सच्या एका तरुणाला तब्बल ४० नावे आहेत. रात्झिल असे त्याचे नाव आहे. त्यामुळे सर्वाधिक नावे असण्याचा विक्रमच त्याच्या नावावर होण्याची चिन्हे आहेत. त्या मुलाचे वय आजघडीला केवळ १८ वर्षांचे असून, तो माध्यमिक शिक्षण घेत आहे. रात्झिल टीमशेल इस्माईल झेरूबाब्बाले झाबूद असे लांबलचक त्याचे नाव सुरूहोते. त्यांचे संपूर्ण नाव बोलायचे झाले तर खूप दम लागतो. त्याच्या आजोबालाही अशीच नावे ठेवण्याची सवय होती. आजोबानेही आपल्या चार मुलांची अशाच प्रकारे नावे ठेवली होती. विशेष म्हणजे या मुलालाच एवढी नावे नसून, त्यांच्या घरात अन्य भावंडांची अशीच नावे आहेत. रात्झिलच्या बहिणीला व भावालाही २० नावे आहेत. 

Web Title: 40 son named