शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

‘दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 8:06 AM

राज्यातील काही जिल्ह्य़ातील शाळा मध्ये प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पध्दती सुरळीत चालू आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत आहे व भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

राज्यातील काही जिल्ह्य़ातील शाळा मध्ये प्रत्यक्ष अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पध्दती सुरळीत चालू आहे. या कोरोनाच्या काळात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दाखवलेला संमय व आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षा असून,  या परीक्षा पध्दतीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा यावर्षी उशिरा होतील असे सूतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा यावर्षी उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात व मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विद्यार्थ्यांचे अवलोकन करून शैक्षणिक परीक्षा होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाईल. असे करत असतानाच जिल्हा पातळीवर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम, आधुनिक भौतिक सुविधा, प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या असल्याचेही त्यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीमध्ये शिक्षण विभागाच्या आढाव्यात म्हटले.  

टॅग्स :ssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा