उच्च, तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेवर विचार होणार- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:47 IST2026-02-27T20:26:45+5:302026-02-27T20:47:59+5:30
राज्यातील शासनमान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे निर्माण करणार का? या प्रश्नाला दिलं उत्तर

उच्च, तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेवर विचार होणार- चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil Education: शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे निर्माण करणार का असा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनमान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी भरती प्रक्रिया करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते. या मुलाखत पॅनलमधील सदस्यांनी गुण द्यायचे असतात. यामध्ये संचालकाचा सहभाग ना हरकत देण्यापुरताच असतो. प्रत्येक पॅनलमधील दिलेल्या सदस्याचे गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात. विद्यापीठाने त्याला मान्यता द्यायची असती. मात्र तरीही शिक्षण विभागाप्रमाणे अथवा त्यापेक्षा सुधारित भरती प्रकिया करण्यासाठी सूचना आली आहे. त्याच्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग नक्की विचार करेल, असे उत्तर त्यांनी दिले.