आरटीई प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ; पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 07:36 IST2026-05-01T07:36:13+5:302026-05-01T07:36:13+5:30
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी केले.

आरटीई प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ; पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना संधी
मुंबई - आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने ८ मेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेऊ शकलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरटीई कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पहिलीसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी महाराष्ट्र शासनाकडून भरली जाते.
पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना संधी
मुदतवाढ दिल्यामुळे उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण विभागाने पालकांनी दिलेल्या कालावधीदरम्यान प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी केले.