शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षण सुविधेबरोबर गुणवत्तेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 00:01 IST

सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही.

- आविष्कार देसाईआज सर्वच क्षेत्रांतील शिक्षण घेणे महाग झाले आहे. आपल्या मुलाला चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये उत्तम शिक्षण मिळण्यासाठी पालक धडपडत आहेत. या शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे. अशात बेताचीच परिस्थिती असलेले पालकही नाना खटापटी करून, आपल्या मुलांना एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, फॅशन डिझायनिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंट अशा कोर्सना पाठवत आहेत. त्यासाठी नवी मुंबई ही रायगडमधील अनेक विद्यार्थ्यांसाठी उपकारक ठरल्याचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसत आहे.शिक्षण हा मानवी उन्नतीचा भक्कम पाया आहे. माणसाचा विकास साधणारे ते साधन आहे. रायगड जिल्हा पनवेलपासून पोलादपूरपर्यंत आणि श्रीवर्धन तालुक्यापर्यंत पसरलेला आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही.रायगड जिल्हा मुंबईला लागून आहे आणि विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणेही जिल्ह्याच्या जवळ आहे. ही केंद्रे शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐतिहासिक काळातही येथील अनेक सामाजिक राजकीय नेते पुण्या-मुंबईकडे शिकण्यासाठी गेले होते असा इतिहास आहे; परंतु हे प्रमाण तुरळक होते. समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचले नव्हते. त्यामुळे शहरांमध्ये शिक्षणासाठी जाणारे आर्थिकदृष्ट्या प्रगत वर्गांमधील होते. १९९०च्या दशकात नवी मुंबईत अनेक शैक्षणिक संस्थांनी जन्म घेतला. त्या ठिकाणी शिक्षण घेणे मध्यमवर्गाच्या आवाक्यात होते. म्हणजेच रायगडमधील पेण आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थी दहावी-बारावीनंतर नवी मुंबईकडे जाऊ शकत होते आणि सध्याही जात आहेत. आपल्या जवळचे आणि शिक्षणाचे उत्तम ठिकाण म्हणून पालक आणि मुलांकडूनही नवी मुंबईला पसंती दिली जात आहेत. विविध क्षेत्राबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारे कॉलेजेस नवी मुंबईत आहेत.रायगड जिल्ह्यातही विविध शिक्षण संस्थांचा विकास झाला. कोकण एज्युकेशन सोसायटी असेल किंवा द.ग. तटकरे अथवा पीएनपी यांची शैक्षणिक संकुले असतील. शिक्षणाचा विकास जिल्ह्यातील ग्रामीण भागातही होत होता. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठही दक्षिण रायगडमधील ग्रामीण भागासाठी अत्यंत उपकारक ठरले. बॅ. ए. आर. अंतुले यांची दूरदृष्टी शिक्षणाच्या प्रांतातही अनुभूतीस येते, हे यावरून सहज लक्षात येते. उत्तर रायगडकर मुंबई-नवी मुंबईकडे उच्चशिक्षणासाठी जात होते आणि तुरळकपणे दक्षिण रायगडमधून नवी मुंबईकडे ओढा होता. माणगाव, महाड, श्रीवर्धन, तळा येथून पुण्याकडेही शिक्षणासाठी जाणारे अनेक होते आणि आजही आहेत.आज अभियांत्रिकी महाविद्यालये रायगडमध्ये आहेत, परंतु अभियांत्रिकी शाखेलाच एक साचलेपण आल्याचा मतप्रवाह आहे. शिक्षणाच्या सुविधा जरूर निर्माण झाल्या, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ येथील युवकांवर आलेली आहे. सरकारने शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक कंपन्या यांच्यात ताळमेळ घालणाऱ्या अनेक योजना आखलेल्या आहेत. मात्र, आजही त्यासाठी राखून ठेवलेला निधी प्रशासनाला वापरतायेत नाही.रायगडपुढे खूप आव्हाने आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्षण, शैक्षणिक सोयी निर्माण झाल्या, पण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी कोण देणार? हा मोठा प्रश्न आजही कायम आहे. भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख हे रोहा येथील होते. सी.डी. देशमुख खरे तर वनस्पती शास्त्रातून एम.एस्सी झाले होते, पण त्यांचे अर्थशास्त्रावरील प्रभुत्व भल्याभल्यांनाही चकीत करणारे असेच होते. गुणवत्ता याला म्हणतात. रायगडच्या शैक्षणिक मूल्यमापनानिमित्त सीडींची आठवण येणे क्रमप्राप्त आहे. असे अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग नेतृत्व रायगडने केलेले आहे ते शिक्षणाच्या जोरावरच. त्यांना दिलेले नुसते शिक्षण नव्हते, तर ते गुणवत्तापूर्ण शिक्षण होते. आज जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची भाषा करणाऱ्यांनी हे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शिवधनुष्य पेलल्यास युवावर्गाच्या प्रगतीला काही अर्थपूर्ण आयाम निश्चितपणे लाभतील, यामध्ये शंका असण्याचे कारण नाही.